गिरीजा प्रभू सोबत झळकणार हा लोकप्रिय अभिनेता….तब्बल ४ वर्षानंतर स्टार प्रवाहावर धमाकेदार एन्ट्री

स्टार प्रवाह वाहिनीवर ३ नव्या मालिका दाखल होत आहेत. त्यातील एका मालिकेची ओळख प्रेक्षकांना झालेली आहे. सुख म्हणजे नक्की काय असतं या मालिकेनंतर गिरीजा प्रभू पुन्हा एकदा स्टार प्रवाहची नायिका बनणार आहे. ‘कोण होतीस तू काय झालीस तू’ या मालिकेत गिरीजा प्रभू कावेरीचे पात्र साकारत आहे. तर वैभव मांगले, अमित खेडेकर, अमृता माळवदकर हे सहाय्यक भूमिकेत दिसणार आहेत. पण मालिकेचा मुख्य नायक कोण असणार हे मात्र गुलदस्त्यात ठेवण्यात आले आहे. दरम्यान या मालिकेत एक प्रसिद्ध चेहरा झळकणार असल्याची खात्री माध्यमातून देण्यात येत आहे.
तब्बल ४ वर्षाने हा नायक पुन्हा एकदा छोटा पडदा गाजवण्यासाठी सज्ज होणार आहे. तो म्हणजे अभिनेता सिद्धार्थ चांदेकर. सिद्धार्थ चांदेकर याने याअगोदर स्टार प्रवाहच्याच ‘सांग तू आहेस का?’ मालिकेतून मुख्य भूमिका साकारली होती. यानंतर सिद्धार्थ झिम्मा, झिम्मा २, फस क्लास दाभाडे अशा चित्रपटात पाहायला मिळाला. खरं तर सिध्दार्थने त्याच्या आतापर्यंतच्या कारकिर्दीत खूप कमी मालिका केल्या आहेत. पण त्याने साकारलेल्या मालिकांपैकी अग्निहोत्र, सांग तू आहेस का मालिकेला प्रेक्षकांनी पसंती दिली.

अल्लड , देखणा हिरो अशी त्याची मालिकेत ओळख असल्याने गिरीजा प्रभू सोबत त्याची जोडी परफेक्ट जुळेल याची खात्री प्रेक्षकांना आहे. कोण होतीस तू काय झालीस तू या मालिकेत सिद्धार्थ चांदेकर मुख्य भूमिका साकारत असल्याचे म्हटले जात आहे. लवकरच येणाऱ्या नव्या प्रोमोमधून याचे स्पष्टीकरण प्रेक्षकांना होईल. तूर्तास या नवीन मालिकेसाठी सिद्धार्थ चांदेकरचे अभिनंदन आणि शुभेच्छा!