news

यशवंत दत्त एवढे देखणे आणि तुम्ही एवढ्या साध्या कशा?…लोकांच्या प्रश्नांवर पत्नीचे उत्तर

दिसायला देखणे पण राहणीमान अतिशय साधी असे दिवंगत अभिनेते यशवंत दत्त यांच्या खाजगी आयुष्याबद्दल आज आणखी काही खास गोष्टी जाणून घेऊयात. यशवंत दत्त हे या इंडस्ट्रीत सर्वांचे ‘बाबा’ म्हणूनच ओळखले जायचे. त्यांचा पेहराव म्हणजे झब्बा आणि लुंगी. चित्रपट पाहायला किंवा हॉटेलात अगदी कुठेही जायचं झालं तरी ते लुंगी किंवा धोतर आणि झब्बा घालूनच जायचे. पण सगळीकडेच त्यांचा हा पेहराव पाहून पत्नी वैजयंती मात्र लाजेल्या व्हायच्या. भैरू पैलवान की जय या चित्रपटासाठी त्यांना पुरस्कार मिळणार होता तेव्हाही ते लुंगी घालूनच जाणार होते. पण सासऱ्यांनीच त्यांना सूट घालायला सांगितला. यशवंत दत्त यांचे सासरे हे त्यांचे मित्रच होते.

yashwant dutt wife vaijyanti and son akshay family
yashwant dutt wife vaijyanti and son akshay family

साळुंखे यांची ‘नवतरंग’ नावाची एकमेव पब्लिसिटी कंपनी होती. नाटकांचे प्रयोग लावणे, चित्रपटांचे डिस्ट्रिब्युशन करणे यामुळे ते मराठी इंडस्ट्रीत ओळखले जायचे. त्यामुळे यशवंत दत्त यांचे नेहमी त्यांच्या घरी जाणे येणे असायचे. अशातच वैजयंतीला त्यांनी लग्नाची मागणी घातली. दोघांचा प्रेमविवाह झाला. दरम्यान यशवंत दत्त यांनी मराठी चित्रपट, नाटक क्षेत्रात मोठे यश मिळवले होते. सततच्या दौऱ्यांमुळे त्यांना घरी यायला वेळ मिळत नसे. पण जेव्हा कधी ते घरी यायचे तेव्हा ते पत्नी मुलासोबत मनसोक्त फिरायचे. चित्रपट, नाटक बघायला जायचे. अर्थात यशवंत दत्त हे दिसायला देखणे असल्यामुळे इंडस्ट्रीत कुजबुज सुरू असायची. अनेकांसोबत त्यांचे नाव जोडले जायचे. पण या सगळ्या गोष्टींवर वैजयंती मात्र कानाडोळा करायच्या. याबद्दल त्या म्हणतात की, ” मी माझ्या घरासंसारत रमलेली असायचे. काहीकाही गोष्टी कानावर यायच्या पण मी त्या सोडून द्यायचे. त्याला मी कधी जास्त महत्वच दिलं नाही.

actor yashwant dutt family
actor yashwant dutt family

कारण मला माझा संसार टिकवायचा होता. मी त्यांच्यासोबत लव्हमॅरेज केलं होतं , प्रचंड प्रेम होतं .त्यामुळे अशा गोष्टी सोडून दिल्या. घरात आले की ते आपले आहेत ना या युक्तीने मी पुढे चालले. त्यांच्या विरोधी भूमिका बघून लोक बऱ्याचदा मला ‘ त्या हिरोईनला ते किती त्रास देतात?, घरी पण असेच वागतात का?’ असे प्रश्न विचारायचे. पण ते घरी असे का वागतील असे मी त्यांना म्हणायचे. एवढंच काय तर ही यशवंत दत्त यांची बायको अशी बाहेर कुठे ओळख करून द्यायचे तेव्हा लोकं ‘ हो! इतकी साधी?’ अशी आश्चर्यकारक प्रतिक्रिया द्यायचे. पण मला हेच कळत नव्हतं की नटांच्या बायकांनी पण काय मेकअप करून हिंडायचं का?. चित्रपटात दाखवतात पण खऱ्या आयुष्यात नट्या सुद्धा बिना मेकअपच्या फिरतात. या अशा लोकांच्या प्रश्नांमुळे मला जास्त मैत्रिणी नाहीत.” अशी खंत त्या व्यक्त करतात.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button