प्रेक्षकांच्या मागणीपुढे सोनी टीव्ही नमलं….सीआयडीमध्ये शिवाजी साटम यांची होणार दमदार एन्ट्री

सीआयडी या सीरिअलचा दुसरा भाग नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. पण या सिरीलमध्ये एसीपी प्रद्युम्न यांचा मृत्यू होणार असे सोनी वाहिनीने जाहीर केले होते. इतकी वर्षे एसीपी प्रद्युम्नची भूमिका शिवाजी साटम यांनी त्यांच्या अभिनयाने गाजवली होती. पण आता हेच पात्र सिरीलमध्ये दिसणार नाही हे कळताच प्रेक्षकांनी नाराजी व्यक्त करण्यास सुरुवात केली होती. शिवाजी साटम यांच्याशिवाय मालिका पाहणं शक्य नाही त्यांना परत बोलवा अशी मागणी सर्वच स्तरातून करण्यात येऊ लागल्याने अखेर सोनी वाहिनीला प्ररक्षकांचं ऐकावं लागत आहे. त्यामुळे लवकरच सीआयडीमध्ये प्रद्युम्नची दमदार एन्ट्री करण्यात येईल असे वाहिनीने जाहीर केले आहे.

इतकी वर्षे एसीपी प्रद्युम्नची भूमिका शिवाजी साटम यांनी त्यांच्या अभिनयाने गाजवली
दरम्यान एसीपी प्रद्युम्न सिरीलमध्ये दिसणार नाहीत ही माहिती स्वतः शिवाजी साटम यांना माहीत नव्हती. ‘निर्मात्यांनी जे ठरवलं आहे त्याबद्दल मला काहीच कल्पना नाही. मे महिन्यात परदेशात मुलाला भेटण्यासाठी जाणार आहे त्यामुळे मी सीरिअल मधून सुट्टी घेतली होती.’ असे शिवाजी साटम यांनी म्हटले होते. आपल्याला या मालिकेतून काढून टाकलंय याबद्दल ते स्वतःच अनभिज्ञ होते. त्यांच्या चाहत्यांनी तर सोशल मीडियावर त्यांना मेसेजेस करण्यास सुरुवात केली होती. तुमच्यामुळे आम्ही ही मालिका बघतो अशी एका पाकिस्तानी चाहत्याने प्रतिक्रिया दिली होती. प्रेक्षकांची हीच मागणी लक्षात घेऊन शेवटी सोनी वाहिनीने त्यांचा निर्णय बदलला आहे. येत्या काही दिवसातच शिवाजी साटम पुन्हा या मालिकेत सक्रिय होतील, त्यासाठी त्यांची दमदार एन्ट्री दाखवली जाईल असे आश्वासन वाहिनीने दिले आहे. त्यामुळे नाराज झालेले प्रेक्षक ही बातमी ऐकताच उत्साहित झाले आहेत.