serials

जेठालालला मागे टाकत सर्वात जास्त मानधन घेणारा मराठी अभिनेता…तब्बल ८ वर्षाने करतोय हिंदी टीव्हीवर कमबॅक

आजवर हिंदी टीव्ही मालिकेत तारक मेहता का उलटा चष्मा तसेच अनुपमा या मालिकेचा बोलबाला पाहायला मिळाला. जेवढा टीआरपी जास्त तेवढंच मालिकेच्या कलाकारांचे मानधन जास्त असा एक सर्वसाधारण हिशोब लावला जातो. त्यामुळे या मुख्य कलाकारांनाही रग्गड मानधन दिले जाते. तारक मेहता का उलटा चष्मा मालिकेतील जेठालाल साकारणारा अभिनेता दिलीप जोशी हे पर डे २.२० लाख रुपये इतकं मानधन घेतात पण आता या स्पर्धेत मराठी अभिनेत्याची एन्ट्री झाली आहे. तब्बल ८ वर्षानंतर हा अभिनेता पुन्हा एकदा हिंदी टीव्ही क्षेत्र गाजवण्यासाठी सज्ज झालेला आहे. हा अभिनेता म्हणजेच शरद केळकर होय.

झी टीव्ही या हिंदी वाहिनीवर ‘तुमसे तुम तक ‘ ही मालिका प्रसारित होत आहे. शरद केळकर आणि निहारिका चौकसे मालिकेत मुख्य भूमिका साकारत आहेत. ही मालिका सुबोध भावे आणि गायत्री दातार यांच्या ‘तुला पाहते रे’ या मालिकवर आधारित असल्याचे बोलले जात आहे. शरद केळकर एका दिवसाला ३ लाख ५० हजार रुपये मानधन घेत असल्याचे बोललं जात आहे. त्यामुळे टीव्ही मालिकेसाठी सगळ्यात जास्त मानधन घेणारा अभिनेता अशी त्याची ओळख बनत आहे. २०१५ च्या एजंट राघव नंतर तो फारसा मालिकेत दिसला नाही. हिंदी, मराठी चित्रपटात तो महत्वपूर्ण भूमिकेत झळकला. आता ९ वर्षानंतर शरदला पुन्हा एकदा मालिकेची ऑफर आली आहे.

sharad kelkar wife Keerti Gaekwad
sharad kelkar wife Keerti Gaekwad

सुरुवातीच्या काळात शरद केळकरने हिंदी मालिकेत सहाय्यक भूमिका साकारल्या पण त्याच्या पर्सनॅलिटीकडे पाहून सात फेरे, सलोनी, सिंदूर तेरे नाम का, कूछ तो लोग कहेंगे अशा मालिकेत मुख्य भूमिका मिळाल्या. बाहुबली चित्रपटातील मुख्य पात्रासाठी डबिंग आर्टिस्ट म्हणून काम केल्यानंतर शरद केळकर भाव खाऊन गेला. त्याचमुळे आता मालिकेत पुनरागमन करण्यासाठी त्याला जास्त मानधन दिलं जात आहे. मराठीत लय भारी, रानटी, हर हर महादेव, राक्षस असे अनेक चित्रपट त्याने साकारले आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button