शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन कृतिशील काम करणारा कलावंत दुर्मिळच… ठरलं तर मग मालिकेतील अभिनेत्याच कौतुक करावं तितकं कमीच
ठरलं तर मग, सावळ्याची जणू सावली मालिकेतील अभिनेता मयूर खांडगे सेंद्रिय शेतीकडे वळले आहेत. सेंद्रिय खताची निर्मिती करून ती शेतकऱ्यांपर्यंत कशी पोहोचवता येईल यासाठी ते प्रयत्न करत आहेत. यानिमित्ताने कवी विष्णू थोरे यांच्या शेतात जाण्याचा योग जुळून आला. मयूर खांडगे यांचे कौतुक करताना विष्णू थोरे म्हणतात की, “मातीची ओल सुकू द्यायची नाही…-अभिनेता मयुर खांडगे रासायनिक खतांचा सर्रास वापर केल्याने दिवसेंदिवस नापीक होत चाललेली माती आणि भविष्यात संकटात येणारी शेती हा एकीकडे चिंतनाचा विषय झाला आहे.
अशातच आपल्या सोबतच शेतीचंही आरोग्य चांगलं रहावं म्हणून झटणारा अनेक मालिका आणि चित्रपटातून आपल्या अभिनयाने स्वतःची वेगळी ओळख तयार करणारा अभिनेता मयुर खांडगे सेंद्रिय शेतीवर काम करतोय. शेतकऱ्यांना भेटून त्याचं महत्व पटवून देतोय. कलावंत म्हणून त्यानं जपलेलं हे समाजभान कौतुकास्पद आहे. शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन कृतिशील काम करणारे कलावंत दुर्मिळ आहेत. मयुरच्या या कामाची सुरुवात चांदवडला माझ्या शेतातून होतेय हा आनंद आहे. “
मित्राची ही प्रतिक्रिया पाहून मयूर खांडगे म्हणतात की, “फक्त चांगला विचार करून चालत नाही तर त्यासाठी त्याच चांगल्या विचारांची माणसं जोडली जाण गरजेचं असत आणि सगळ्यात पहिला तू माझ्या विचारांशी जोडला गेला आणि तुझ्यामुळे माझ पाहिलं पाऊल पडलं🙏तुझ्यासारखी माणसं अशीच ह्या विचाराला जोडली जाऊन लवकरच ह्या कामाची दिंडी तयार होईल अशी आशा करू थँक्यू विष्णू दादा 🙏”.