आपलं घर छोटंस जरी असलं तरी त्या घराला आपण हवं तसं सजवून मन प्रसन्न ठरवण्याचा प्रयत्न करतो. कलाकार कोट्यातून आजवर अनेक कलाकारांना म्हाडाची घरं मिळाली आहेत. मुंबई सारख्या ठिकाणी कमी दरात घरं मिळणं यामुळे शक्य झालं आहे. त्यामुळे मराठी सृष्टीतील बरेचसे कलाकार ही घरं मिळवण्यासाठी प्रयत्न करत असतात. हेमांगी कवीने देखील म्हाडाचं घर तिला हवं तसं सजवून घेतलं आहे. तर भारत गणेशपुरे हे देखील गेली अनेक वर्षे म्हाडाच्याच घरात वास्तव्यास आहेत. भारत गणेशपुरे यांनी नुकत्याच आपल्या या घराला नवीन लूक दिला आहे. आपल्याला हवं तसं इंटेरिअर करून घेतल्याने त्यांच्या घराला एक छान लूक मिळाला आहे. भारत गणेशपुरे हे गेली अनेक वर्षे मराठी इंडस्ट्रीत काम करत आहेत. चला हवा येऊ द्या या शोमूळे त्यांना मोठी प्रसिद्धी मिळाली.
या लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचताना त्यांना अनेक पुरस्कारांनी गौरविण्यात आले. त्यांनी मिळवलेली ही सर्व बक्षिसं घराच्या हॉल मध्ये छान सजवण्यात आली आहेत. घराचे इंटेरिअर करताना त्यांनी पांढऱ्या रंगाच्या थीमला प्राधान्य दिले आहे त्यामुळे त्यांचं हे छोटंसं घर आता प्रशस्त वाटू लागलं आहे. भरपूर सूर्यप्रकाश आणि हॉलच्या गॅलरीसमोर त्यांना निसर्गाच्या सौंदर्याचा आस्वाद घेता येत आहे. चाहत्यांनी दिलेल्या बऱ्याचशा भेटवस्तू देखील त्यांनी जपून ठेवल्या आहेत. हॉलच्या एका कोपऱ्यात या वस्तुंना ततानी एक राखीव जागा ठेवली आहे. त्यामुळे हॉलच्या सौंदर्यात अधिकच भर पडली आहे. भरत गणेशपुरे यांच्या मुलाची बेडरूम सुद्धा त्याला हवी तशी त्यांनी सजवून दिली आहे. तर मास्टर बेडरूममध्ये त्यांनी पुस्तकांसाठी एक खास जागा बनवून घेतली आहे. यामुळे भारत गणेशपुरे यांच्या वाचनाची आवड ते आजही जोपासताना पाहायला मिळत आहेत. म्हाडाची घरं छोटी असली तरी भारत गणेशपुरे यांनी ती आटोपशीर सजवून घेतल्याने कुठेही अडगळ जाणवत नाही.
भरपूर उजेड येईल अशा प्रकारे इंटेरिअर केल्यामुळे त्यांच्या घराला चॅन गेटअप आलेला आहे. त्यांच्या या घराची सफर त्यांनी एका व्हिडिओतून करून दिली आहे. विदर्भातील बरेचसे कलाकार आता मराठी इंडस्ट्रीत स्वतःच्या अभिनयाचा ठसा उमटवू लागले आहेत. भारत गणेशपुरे यांच्या विदर्भीय भाषाशैलीचे सर्वानाच कुतूहल वाटत होते. शालेय शिक्षणात अजिबात रस नसणाऱ्या भारत गणेशपुरे यांनी अभिनयाच्या वेडापायी मुंबईत पाऊल टाकले होते. छोटया छोट्या मिळेल त्या भूमिका करत आज त्यांनी हे एवढे मोठे यश संपादन केले आहे. येत्या ६ ऑक्टोबर रोजी प्रदर्शित होत असलेल्या अंकुश चित्रपटातून ते एका महत्त्वाच्या भूमिकेत झळकणार आहेत. या नवीन चित्रपटाच्या यशासाठी त्यांना शुभेच्छा.