अरुंधतीचं भूत पाहून अनिरुद्ध घाबरला…आई कुठे काय करते मालिकेत संजना आणि अनिरुद्धला शेवटचा धडा
आई कुठे काय करते ही मालिका लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. गेली ५ वर्षे या मालिकेने प्रेक्षकांचे मनोरंजन केले होते. पण आता ३० नोव्हेंबर रोजी ही मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. त्यामुळे मालिकेचे शेवटचे भाग प्रेक्षकांसाठी मनोरंजनात्मक ठरले आहेत. मालिकेच्या या निर्णायक वळणावर अरुंधतीचा अपघात होतो आणि यात ती दगावते असं दाखवलं जात आहे. खरं तर हे कटकारस्थान संजना आणि अनिरुद्धने रचलेलं असतं. अरुंधतीला संपवण्यासाठी हे दोघेही प्लॅन रचत असतात.
तेव्हा अरुंधती मरते असा त्याला निरोप मिळतो. पण त्याच क्षणी दारात अरुंधतीचं भूत त्याच्यासमोर उभं राहतं. तिला घाबरून अनिरुद्ध त्याच्या आजवरच्या चुकांची कबुली देतो. हा अपघातही मीच घडवून आणला असे ही तो तिला सांगताना दिसतो. खरं तर यश आणि अरुंधती दोघेही अनीरुद्धल बोलतं करण्यासाठी हा बनाव रचत असतात. संजना आणि अनिरुद्धला शेवटचा धडा म्हणून हे दोघेही डाव रचत आहेत आणि त्यात त्यांना यश मिळालं आहे. पण इकडे मात्र अनिरुद्धला संजनाची बोलणी खावी लागत आहेत.
अरुंधतीजवळ सगळं कबूल केल्याने संजना अनिरुद्धला धारेवर धरताना दिसत आहे. त्यामुळे ही मालिका आता निर्णायक वळणावर येऊन ठेपली आहे. अनिरुद्ध आणि संजना दोघांना त्यांच्या गुन्ह्यांची उपरती होणार आहे. त्यात आता शेखरची देखील एन्ट्री होणार असल्याने मालिकेचे हे शेवटचे भाग रंजक ठरणार आहेत. आता अनिरुद्ध अरुंधती पुन्हा एकत्र येणार की तिचा मार्ग बदलवणार हे आता शेवटच्या भागातच स्पष्ट होईल.