झी मराठीवर नव्या मालिकांचा धुमाकूळ…या ३ नव्या मालिका लवकरच पाहायला मिळणार तर जुन्या रटाळवाण्या मालिका

झी मराठीवर आता नवीन मालिका पाहायला मिळणार आहेत. जुन्या रटाळवाण्या मालिका आता संपवून त्याजागी नव्या मालिका पाहायला मिळणार आहेत. “देवमाणूस- मधला अध्याय”, “चल भावा सिटीत” या मालिकेनंतर झी मराठी आणखी एका नव्या मालिकेची घोषणा केली आहे. चल भावा सिटीत हा रिऍलिटी शो नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. तर देवमाणूस मधला अध्याय ही मालिकाही लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या दोन शो पाठोपाठ आता “इच्छाधारी नागीण” या नावाने आणखी एक नवी मालिका झी मराठी वाहिनी प्रसारित करणार आहे.
झी मराठीवरील “अप्पी आमची कलेक्टर” हि मालिका नुकतीच बंद झाली आहे. या मालिकेच्या जागी नव्या येणाऱ्या ३ मालिकांमधील एक मालिका अप्पीच्या मालिके ऐवजी पाहायला मिळणार आहेत. पण आणखीन कोणत्या मालिका निरोप घेणार हे येत्या काही दिवसात समजेलच. “इच्छाधारी नागीण” मालिकेचा व्हिडिओ देखील नुकताच लाँच करण्यात आला आहे. (सूड आणि प्रेमाच्या या अजब खेळात काय निवडेल ‘नागकन्या’? नवीन मालिका इच्छाधारी नागीण लवकरच आपल्या झी मराठीवर!) त्यामुळे आणखी एका मालिकेला लवकरच प्रेक्षकांचा निरोप घ्यावा लागत आहे