मराठी कलाकार हिंदी मालिका सृष्टीत प्रमुख भूमिका साकारताना पाहायला मिळतात. त्यातीलच एक म्हणजे अभिनेत्री राजश्री वैद्य. राजश्री वैद्य ही पुन्हा एकदा झी वाहिनीची एक नवीन मालिका गाजवण्यासाठी सज्ज झाली आहे. उद्या ३ डिसेंबर पासून झी टीव्हीवर संध्याकाळी ७ वाजता ‘बस इतना सा ख्वाब है’ ही नवीन मालिका प्रसारित होत आहे. अभिनेत्री राजश्री ठाकूर वैद्य या मालिकेत प्रमुख भूमिका साकारत आहे. तर अभिनेता योगेंद्र विक्रम सिंह तिला साथ देणार आहे. राजश्री ठाकूर हिच्याबद्दल सांगायचं झालं तर ती मुंबईतच लहानाची मोठी झाली.
ऑल इंडिया रेडिओसाठी तिने मराठी वृत्त निवेदिका म्हणून सुरुवातीला काम केले होते. हवा आने दे हा तिने अभिनित केलेला पहिला चित्रपट. या चित्रपटानंतर सात फेरे मालिकेतून तिला प्रमुख भूमिका साकारण्याची संधी मिळाली. सलोनी, शादी मुबारक, छोटी बहु, बनू मै तेरी दुलहन अशा हिंदी मालिका गाजवल्यानंतर ती हिरकणी या मराठी चित्रपटात झळकली होती. २००७ साली नाट्य अभिनेता संज्योत वैद्य सोबत तिने संसार थाटला. नायरा ही त्यांना एकुलती एक मुलगी आहे. सावळ्या अभिनेत्रींना प्रमुख भूमिकेपासून डावलण्यात येतं मात्र राजश्री याबद्दल अपवाद ठरली
सावळी असूनही राजश्रीला हिंदी मालिकेची नायिका बनण्याचा मान मिळाला. तिच्याकडे पाहून सावळ्या रंगापेक्षा तिची अभिनय क्षमताकिती दांडगी आहे हे समजून येते. तिच्या वाट्याला तशा दमदार भूमिकाही येत गेल्या. मराठी सृष्टीतही तिने नशिब आजमावण्याचा प्रयत्न केला. बस इतना सा ख्वाब है या मालिकेतून ती पुन्हा एकदा प्रमुख भूमिकेत पाहायला मिळणार आहे. या नवीन मालिकेसाठी ती खुपच उत्सुक असल्याचे पाहायला मिळते.