serials

शिवा सुर्या एकत्र येताच भडकले प्रेक्षक…झी मराठी नंतर आता स्टार प्रवाह वाहिनीनेही सुरू केला ट्रेंड

झी मराठी वाहिनीने एक नवीन ट्रेंड सुरू केला आहे. काही दिवसांपूर्वी झी मराठीच्या ‘सावळ्याची जणू सावली’ आणि ‘पारू’ या मालिकेचा एकत्रित संगम पाहायला मिळाला. पारू आणि सावली दोघी मैत्रिणी दाखवण्यात आल्याने त्या एकमेकांना भेटायला येतात असा हा ट्विस्ट आठवडाभर सुरू होता. पण आता झी ने पुन्हा असाच एक ट्रॅक ‘शिवा’ आणि ‘लाखात एक आमचा दादा’ या मालिकेसाठी घडवून आणला आहे. शिवा काही कामानिमित्त बाईआजी बरोबर साताऱ्यात जाते तिथे तिचा बालपणीचा मित्र सुर्या तिला भेटतो.

पण हा ट्रॅक पाहून प्रेक्षकांनी मात्र डोक्याला हात लवळक आहे. शिवा आणि सुर्या दोघेही मित्र दाखवले त्याचप्रमाणे आता झी मराठीच्या इतरही मालिका अशाच दाखवाव्यात. म्हणजे हे सगळे कलाकार एकाच मालिकेत दाखवले जातील अशी मिश्किल प्रतिक्रिया प्रेक्षकांकडून दिली जात आहे. काही प्रेक्षकांना हा बदल आवडला असला तरी आता मात्र तिकडे स्टार प्रवाह वाहिनीनेही झी ची कॉपी करण्याचा प्रयत्न केला आहे. मालिकेच्या नायक नायिकेला दुसऱ्या मालिकेचे नायक नायिका मदत करतात हा एक ट्रेंड आता स्टार प्रवाहवरही पाहायला मिळत आहे.

aboli and yed lagl premach actors in one part
aboli and yed lagl premach actors in one part

अबोली ही मालिका लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. त्यामुळे कथानकाची उत्सुकता वाढवून ठेवण्यासाठी अबोली या मालिकेत येड लागलं प्रेमाचं या मालिकांमध्ये महायुती पाहायला मिळणार आहे. झी मराठीची कॉपी केली म्हणून आता स्टार प्रवाहाला प्रेक्षकांनी धारेवर धरलं आहे. केवळ चर्चेत राहण्यासाठी किंवा टीआरपी वाढवण्यासाठी वाहिनींचा हा प्रयत्न पाहून प्रेक्षकांना आता काय करावं असा प्रश्न पडला आहे. महाराष्ट्राच्या राजकारणाप्रमाणे मालिकेतही महायुती पाहायला मिळते त्यामुळे हा एक चेष्टेचा विषय ठरला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button