अलका कुबल, शरद पोंक्षे ह्यांचा नंतर आणखी एका अभिनेत्याचं अपत्य सिनेक्षेत्रा शिवाय एविएशन क्षेत्रात
मराठी सृष्टीतील प्रसिद्ध अभिनेते शरद पोंक्षे यांच्या लेकीने सिद्धी पोंक्षे हिने आकाशाला गवसणी घालत पायलट बनण्याचे स्वप्न साकार करून आपल्या वडिलांची मान उंचावली. ह्या आधी देखील अभिनेत्री अलका कुबल यांची मुलगी ईशानी आठले हिने देखील पायलट बनून सर्वाना आश्चर्याचा धक्का दिला. सिनेसृष्टीतील कलाकारांची मुले देखील अभिनय क्षेत्राशी निगडीतच काम करताना पाहायला मिळतात. पण आपल्या मेहनतीने अशी यशाची उंची खूपच कमी मुलांना गाठता येते. पण हि अवघड चढाई सर केल्यावर आई वडिलांची मान गर्वाने उंचावते. अलका कुबल, शरद पोंक्षे ह्यांचा नंतर आणखी एका अभिनेत्याचं हेच स्वप्न सरकार झालाय. हा अभिनेता म्हणजे देवमाणूस मालिकेतील लाला मामा साकारणारे अभिनेते डॉ शशिकांत डोईफोडे.
मराठी सिरीअल च्या इतिहासात देवमाणूस सिरीअल सारखा टी आर पी कोणत्याही सिरीअल ने आतापर्यंत गाठला नाही .देवमाणूस सिरीअल मधील एक पात्र “ लाला मामा “ ह्या पात्राने खुप धमाल केली होती ते पात्र करणारे होते डॉ शशिकांत डोईफोडे पण सध्या कोणत्याच सिरीअल मध्ये ते दिसत नाहीत .डॉ शशिकांत डोईफोडे मुळ चे चित्रपट निर्माता आणि दिग्दर्शक .अभिनय क्षेत्रात ते कधीच नव्हते पण केवळ वज्र प्रोडक्शन चे निर्माता संजय खांबे आणी श्वेता शिंदे यांचा सुचनेने कास्टिंग डायरेक्टर मकरंद गोसावी ह्यांचा आग्रहाने डॉ शशिकांत डोईफोडे ह्यांनी देवमाणूस मधे “ लाला मामा “ हा रोल साकारला . पण देव माणूस नंतर हा लाला मामा कुठे गायब झाला हे कारण आले समोर.
देवमाणूस सिरीअल शुटींग सुरू असताना डॉ शशिकांत डोईफोडे ह्यांचे चिरंजीव चिराग डोईफोडे पायलट चे प्रशिक्षण घेत होते . सिरीअल चा कामातून डॉ शशिकांत डोईफोडे मुला साठी वेळ देवू शकत नव्हते .देवमाणूस नंतर कुठेही अभिनय न करता किंवा नविन सिनेमा न करता फक्त आपल्या मुला साठी वेळ दिला . सध्या लाला मामा म्हणजे डॉ शशिकांत डोईफोडे ह्यांचा मुलगा पायलट चिराग डोईफोडे vipफ्लाईंग करत आहे . महाराष्ट्रातील मोठमोठे राजकीय नेते तसेच टीम इंडिया मधील मोठे क्रिकेट प्लेयर जसे रोहित शर्मा यांचा सोबत फ्लाइंग सर्विस मधे आहे .आता लवकरच डॉ डोईफोडे पुन्हा एकदा अभिनयाची चुनूक दाखवतील किंवा नविन मराठी सिनेमा घेवून येतील अशी अपेक्षा आहे.