news

मला चित्रपट अजिबात आवडला नाही तो सिनेमा चांगला असता तर मी … नवरा माझा नवसाचा २ चित्रपट पाहून अभिनेत्याची रोखठोक प्रतिक्रिया

नवरा माझा नवसाचा या चित्रपटानंतर तब्बल १९ वर्षाने त्याचा सिकवल बनवण्यात आला. त्यामुळे या चित्रपटाबाबत प्रेक्षकांमध्ये उत्सुकता दिसून आली. गेल्या आठवड्यात २० सप्टेंबर रोजी हा चित्रपट प्रदर्शित करण्यात आला. उत्सुक प्रेक्षकांनी प्रिबुकिंग करत हा चित्रपट ६०० हून अधिक चित्रपट गृहात हाऊसफुल्ल केला. दरम्यान चित्रपटाने पहिल्याच दिवशी १.८५ कोटींची कमाई केली होती. तर आतापर्यंत चित्रपटाने ११.२५ कोटींचा बिजनेस केलेला पाहायला मिळत आहे. चित्रपटाला प्रेक्षकांकडून उत्तम प्रतिसाद मिळत आहे. पण काही प्रेक्षकांनी चित्रपट आवडला नसल्याचे म्हटले आहे. प्रेक्षकांची ही बाजू मांडताना एका अभिनेत्यानेही चित्रपटाबद्दल नाराजी दर्शवली आहे.

navara maza navsacha 2 movie seen
navara maza navsacha 2 movie seen

तू चाल पुढं मालिकेतून छोट्या पडद्यावर पदार्पण करणारा अभिनेता ध्रुव दातार सध्या स्टार प्रवाहच्या लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेत विरोधी भूमिका साकारत आहे. नुकताच ध्रुवने नवरा माझा नवसाचा २ हा चित्रपट पाहिला. पण चित्रपट पाहिल्यानंतर ध्रुवने सोशल मीडियावरच चित्रपट आवडला नसल्याचे सांगितले. सोशल मीडियावर काही प्रेक्षकांना चित्रपट आवडलं नसल्याचं बोललं जात आहे. याबाबत एका मराठी अभिनेत्याने पोस्ट शेअर करत आपलं स्पष्ट मत मांडलं आहे. ध्रुव दातारने एक स्टोरी शेअर करताना “खरंच खूप वाईट चित्रपट आहे” असे म्हटले त्यावर चाहत्यांनी त्याला ट्रोल केले. आपल्याच कलाकारांना तू असं कसं म्हणू शकतोस असे प्रश्न त्याला विचारले जाऊ लागले.

sachin and swapnil navara maza navasacha 2movie
sachin and swapnil navara maza navasacha 2movie

पण प्रेक्षकांना उत्तर देताना ध्रुव याबाबत स्पष्टीकरण देताना म्हणतो की, “‘नवरा माझा नवसाचा २’ चित्रपटाबद्दल मी एक स्टोरी टाकली होती. त्यात मी खूप वाईट चित्रपट आहे असं लिहिलं होतं. त्यानंतर मला बऱ्याच लोकांचे मेसेज आले की, तू एक मराठी कलाकार आहेस आणि तू असं नाही बोललं पाहिजेस. अरे पण, मी का बोलू नये? मी फक्त माझं मत मांडलं. मला तो चित्रपट अजिबात आवडला नाही. मी चांगल्या गोष्टीचं नेहमीच कौतुक करतो आणि तो सिनेमा चांगला असता, तर मी नक्कीच कौतुक केलं असतं. पण, तो चित्रपट खरंच खूप वाईट आहे.”

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button