news

अरबाजचं तथाकथित गर्लफ्रेंडत्याच्या सोबतचं नातं मोडलं… मला अरबाज संबंधित मॅसेज करू नका आणि

मराठी बिग बॉसच्या घरात अरबाज पटेल निक्कीसोबतच्या जवळकीमुळे चांगलाच चर्चेत आला आहे. अभिजित सोबत निक्कीने बोलू नये असा पवित्रा अरबाजने अनेकदा घेतला होता. पण यासोबतच त्याने मी बाहेर कोणाशीतरी कमिटेड आहे याचीही कबुली दिली होती. त्यामुळे अरबाज निक्कीसोबत जे करतोय ते केवळ प्रेक्षकांचे लक्ष वेधावे म्हणूनच करतोय असे चित्र आता स्पष्ट झाले आहे..पण अरबाजच्या या वागण्याने त्याची कथाकथीत गर्लफ्रेंड मात्र नाराज झाली आहे. लिझा बिंद्रा या पंजाबी सोशल मीडिया स्टारसोबत अरबाजचे अफेअर होते.

leeza bindra and arbaz
leeza bindra and arbaz

अनेकदा हे दोघे एकत्रित बनवलेले कंटेंट सोशल मीडियावर शेअर करत असत. “कमिटेड गर्लफ्रेंड” असा शिक्का लिझाने तिच्या इन्स्टाग्रामवर दिला होता पण हा शिक्का आता तिने हटवलेला पाहायला मिळत आहे. बिग बॉसमध्ये अरबाज निक्कीशी जवळीक साधण्याचा प्रयत्न करतोय हे पाहून लिझाचे डोळे उघडले आहेत. “अरबाजच्या संबंधित कुठल्याही कमेंट्स मला करू नका” अशी तिने तिच्या चाहत्यांना विनंती केली आहे. अरबाज तुझं पहिलं प्रेम आहे का? या चाहत्यांच्या कमेंटवर लिझाने ” माझं पहिलं प्रेम हे माझ्या वडिलांवर आहे” असे नाराज लिझाने उत्तर दिले आहे. लिझाचे चाहते अरबाज किती फसवतोय हे तिला निदर्शनास आणून देत आहेत. त्या प्रत्येक कमेंट वर लिझाने अरबाजशी नातं तोडल्याचे म्हटले आहे.

leeza bindra actress and dancer
leeza bindra actress and dancer

याअगोदरही अरबाज स्प्लिट्सव्हीलाच्या ५ व्या सिजनमध्ये सहभागी झाला होता तेव्हा तो नायरा आहुजासोबत फ्लर्ट करताना दिसला. असाच काहीसा प्रकार तो निक्कीसोबत करत असल्याने लिझाने आता अरबाज सोबतचं नातं संपुष्टात आणलं आहे. लिझा मराठी बिग बॉसच्या घरात जावी अशी तिच्या चाहत्यांनी मागणी केली आहे. लिझा घरात जाईल तेव्हा अरबाजचं तोंड पाहायला मज्जा येईल असेही तिला म्हटले जात आहे. लिझालाही अरबाजचे हे वागणे पटले नसल्याने तिने कमिटेड शब्दच हटवून टाकला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button