serials

मनी मावशीला पळता भुई थोडी…अप्पी शिकवणार मनी मावशीला चांगलाच धडा

अप्पी आमची कलेक्टर या मालिकेला अमोलच्या येण्यामुळे चांगलाच टीआरपी मिळाला आहे. पण आता अप्पी आमची कलेक्टर ही मालिका लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. या मालिकेच्या जागी प्रेक्षकांना महेश कोठारे यांची ‘सावळ्याची जणू सावली’ ही मालिका बघायला मिळणार आहे. पण असे असले तरी अप्पी आमची कलेक्टर ही मालिका प्रेक्षकांच्या मनोरंजनात जराही कसूर करताना दिसत नाही. कारण आता फुई आज्जीचं सत्य लवकरच सगळ्यांसमोर येणार आहे. रूपालीने मनी मावशीला अप्पीच्या घरी फुई आज्जी बनून पाठवलं आहे. मनी मावशीने वेष बदलला असला तरी ती कृत्यातून मनी मावशी कशी आहे हे वारंवार निदर्शनास आणून देत आहे.

mani mavshi in appi amchi collector
mani mavshi in appi amchi collector

लवकरच या मालिकेत एक निर्णायक ट्विस्ट तुम्हाला पाहायला मिळणार आहे. अप्पीला मनी मावशीचं सत्य उलगडणार आहे फुई आज्जी हीच मनी मावशी आहे हे समजताच अप्पी तिच्या पद्धतीने मनी मावशीला धडा शिकवणार आहे. मनी मावशी किती कामचुकार आहे हे सगळ्यांना माहीत आहे. पण आता अप्पी तिला धडा शिकवण्यासाठी कामाचा ढिगारा पुढे करणार आहे. घराची साफसफाई, भांडे घासणे, कपडे धुणे यामुळे मनी मावशीला पळता भुई थोडी झाली आहे. मालिकेचा हा रंजक ट्विस्ट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे त्यामुळे मालिकेचे हे भाग पाहण्यासाठी प्रेक्षकांनी प्रचंड उत्सुकता दाखवली आहे. अमोल मुळे दूर गेलेली दोन कुटुंब एकत्र आली आहेत.

आता अप्पी या कुटुंबाची गाठ एकत्रित कशी बांधून ठेवणार हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे. रुपाली आणि मनी मावशी दोघीही अप्पीला त्रास देत आहेत. अर्जुन आणि अप्पी एकत्र येऊ नयेत म्हणून रूपालीने अनेक घाट घातले. पण अमोलमुळे तिच्या या कृत्यावर सगळे पाणी फिरले. पण आता रुपालीने मनी मावशीला हाताशी धरून आणखी एक डाव योजला आहे. पण आता अप्पी त्यांचा हा डाव उधळून लावणार आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button