news

“एक्स बॉयफ्रेंड” म्हणत प्रसिद्ध अभिनेत्रीचा थाटात पार पडला साखरपुडा…लवकरच करणार लग्न

एक्स बॉयफ्रेंड असे म्हणत अभिनेत्रीने तिच्या साखरपुड्याची बातमी शेअर केली आहे. ही अभिनेत्री आहे हेमल इंगळे. हेमल देव या नावानेही हेमलने मनोरंजन विश्वात ओळख बनवली आहे. मूळची कोल्हापूरची असलेली हेमल सचिन पिळगावकर यांच्या अशी ही आशिकी या मराठी चित्रपटातून मुख्य भूमिकेत झळकली होती. आता सचिन पिळगावकर यांच्याच नवरा माझा नवसाचा २ चित्रपटातून ती प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. पण हा चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वी हेमलच्या आयुष्यात एक सुखद क्षण आलेला आहे. आणि तो क्षण म्हणजे हेमलने तिचा खास बॉयफ्रेंड सोबत साखरपुडा केला आहे.

navra maza navsacha actress hemangi ingle
navra maza navsacha actress hemal ingle

‘एक्स बॉयफ्रेंड’ म्हणत हेमलने तिच्या या साखरपुड्याची बातमी शेअर करताच तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. यावेळी रॉयल ब्लू कलरच्या डिझायनर ड्रेसमध्ये हेमल खूपच सुंदर दिसत आहे. तर तिच्या होणाऱ्या नवऱ्यानेही त्याच कलरच्या थीमला अनुसरून कुर्ता परिधान केला आहे. हेमलने तिच्या कॅप्शनमध्ये एक्स बॉयफ्रेंड सोबत साखरपुडा केल्याचे सांगते. त्यामुळे तिने ज्याच्याशी प्रेम केलं तोच आता तिचा नवरा होणार असल्याचे ती स्पष्ट करते. दरम्यान हेमलचा हा बॉयफ्रेंड कोण आहे हे तिने अजून तरी गुलदस्त्यात ठेवलं आहे.

hemal ingle wedding engagement photos
hemal ingle wedding engagement photos

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button