serials

तू मराठी माणसाचा अपमान केलाय आत्ताच्या आता… निक्की तांबोळीचा रितेश देशमुख घेणार खरपूस समाचार

मराठी बिग बॉसच्या ५ व्या सिजनचा विकेंड वॉर चांगलाच गाजणार आहे. कारण या विकेंड वॉरमध्ये रितेश देशमुख निक्की तांबोळला खरपूस शब्दांत सूनावताना दिसणार आहे. रोखठोक शब्दांत रितेशने निक्कीला ताळ्यावर आणण्याचा प्रयत्न केल्याने प्रेक्षक खुश होणार आहेत. मराठी बिग बॉस सुरू झाल्यापासूनच निक्की तांबोळीच्या नावाची चर्चा पाहायला मिळाली. वर्षा उसगावकर यांचि तिने पहिल्याच दिवशी अक्कल काढली होती तेव्हा प्रेक्षक तिच्यावर चांगलेच भडकले होते. त्यानंतरही ती वर्षा उसगावकर यांच्याशी वाद घालताना दिसली. अंकिता, सूरज चव्हाण, आर्या जाधव यांनाही ती भांडत होती. तिचं हे वागणं पाहून प्रेक्षकांनी तिला बाहेर काढण्याची मागणी केली. रितेश देशमुखकडून विकेंड वॉमध्ये निक्कीला ओरडा मिळायला हवा अशी मागणी होत असताना च शोचा नवीन प्रोमो प्रेक्षकांना सुखावणारा ठरला आहे.

कारण रितेशने खरपूस शब्दांत निक्कीला बाहेरचाच रस्ता दाखवला आहे. फोन दिवसांपूर्वी निक्की तंबोळीने मी मराठी बिग बॉसच्या घरात यायला तयार नव्हते असे आर्याशी भांडताना म्हटले होते. मराठी लोकांची मेंटेलिटी मॅच होत नाही असे म्हणत तिने वादग्रस्त वक्तव्य केले होते. याच वक्तव्यावरून रितेशने निक्कीला चांगलंच सुनावलेलं पाहायला मिळत आहे. ” ईथे मराठी माणसाची मेंटेलिटी काढून मराठी माणसाचा अपमान केलाय”…रितेशच्या बोलण्यावर पुढे निक्की हात वर करते तेव्हा रितेश तिला ओरडून म्हणतो की, ” हात खाली आता मी बोलतोय, आताच्या आता माझ्या मराठी माणसाची माफी मागायला हवी, या घरात ज्याला बोलायचं भान नाही त्याला इथे स्थान नाही.

ritesh deshmukh angry on nikki tamboli
ritesh deshmukh angry on nikki tamboli

” रितेशच्या या खरपूस समाचारानंतर निक्की तांबोळी काय बोलते हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. तिला बिग बॉसच्या घरचा बाहेरचा रस्ता दाखवणार की अजून एक संधी देणार हे आज पाहावं लागेल. दरम्यान निक्की तांबोळीच्या वागण्यावरून अनेक मराठी सेलिब्रिटींनी तिला विरोध दर्शवला आहे. वर्षा उसगावकर या एक सिनिअर अभिनेत्री आहे आणि त्यांच्याशी तिने कसं वागावं याचं तिला अजिबात भान नाही असे म्हटले आहे तर जय दुधानेने निक्कीला बिग बॉसच्या खेळातली आजवरची सगळ्यात वाईट कंटेस्टंट म्हणून संबोधले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button