२०१८ ला अंडर कंट्रक्शन फ्लॅट ५२ लाखाला घेतला आजवर काम पूर्ण झालेच नाही… १६ मजले चालत वर खाली ना पाण्याची सोय त्रासलेल्या अभिनेत्याने
सध्या लोक रेरा रजिस्टर स्कीम बघून फ्लॅट बुक करतात. अंडर कंट्रक्शन फ्लॅट थोड्या कमी पैश्यात मिळतो शिवाय रेरा रजिस्टर असल्यामुळे काम पूर्ण होईलच अशी ग्राहकांना आशा असते. पण कोरोना गेला तरी आजवर अशा अनेक केस पाहायला मिळतात ज्यात बिल्डरने ग्राहकांची चांगलीच पिळवणूक केली कम्प्लेंट करून देखील बिल्डर कायद्याला भीक घालत नाही. रेरा बिल्डरचेच रक्षण करतो असं चित्र सर्वत्र पाहायला मिळत. अशीच एक तक्रार अभिनेता अंशुमन विचारे याने व्यक्त केलेली पाहायला मिळाली होती. आता ह्यात आणखीन एक मराठी अभिनेता बिल्डरच्या त्रासाला कंटाळलेला पाहायला मिळतोय. माझ्या नवऱ्याची बायको फेम पांडुरंग भारती यांनी बोलक्यारेषाला दिलेल्या मुलाखतीत हि गोष्ट उघड केली आहे.
अभिनेते पांडुरंग भारती म्हणतात “आमच्या बिल्डरने आधीचे प्रोजेक्ट वेळेत पूर्ण केले त्यामुळे मी २०१८ ला अंडर कंट्रक्शन मध्ये घर बुक केले होते २ bhk फ्लॅट कल्याणच्या गांधारी एरियामध्ये तब्बल ५२ लाखात खरेदी केला त्याचे पजेशन २०१९ ला मिळणार होते परंतु बिल्डर आणि त्यांच्या पार्टनर मधील वादामुळे काम खूपच हळूहळू सुरू होते त्यात कोरोनामुळे लॉकडाऊन सुरू झाले आणि काम पूर्णपणे ठप्प झाले २०२२ उजाडले तरीही पजेशन मिळत नव्हते. एका बाजूला भाडे भरायचे आणि दुसऱ्या बाजूला बँकेचे हप्तेही भरायचे त्यामुळे आर्थिक गणित पूर्ण कोलमडले. ज्यांची जागा होती त्या लोकांना मध्यस्ती धरून मी बिल्डरकडुन माझ्या फ्लॅटचे काम पूर्ण करुन घेतले रफ पजेशन घेऊन फ्लॅटमध्ये राहायलाही आलो. काही दिवस सर्व व्यवस्थित चालले परंतु माझ्यासारखे त्रस्त लोक नाइलाज म्हणून बिल्डिंगचे काम अपूर्ण असतांना राहायला आले आज ती संख्या जवळजवळ ५० झाली. राहायला आल्यावर प्रॉब्लेम संपले असे वाटत होते परंतु तसे काही झाले नाही दोन्ही बिल्डर मधील वादामुळे बिल्डिंगचे २०% काम अपूर्ण आहे त्यासाठी बिल्डर पैसे मागत आहेत आणि फ्लॅट धारकांनी जवळजवळ ९५% रक्कम बिल्डरला दिली आहे जोपर्यंत आणखी पैसे मिळत नाही तोपर्यंत बिल्डर राहिलेले काम सुरू करत नाही आणि काम सुरू झाल्याशिवाय फ्लॅटधारक उरलेली रक्कम देत नाहीत त्यामुळे परिस्थिती जिथल्या तिथे थांबलीय बिल्डिंगचे काम पूर्ण नसल्यामुळे महानगर पालिकेकडुन OC मिळत नाही ना पाण्याची लाईन त्यामुळे कधीकधी दोन तीन दिवसातून एकदा पाणी मिळतं ,खरतर जोपर्यंत OC येत नाही तोपर्यंत प्राथमिक सुविधा पुरवणे बिल्डरचे काम आहे परंतु आता तर बिल्डरने सुरक्षारक्षक आणि सफाईवाला बंद केलाय.
एकच लिप्ट असल्यामुळे ती अनेकदा बंद पडते आतासुध्दा गेल्या दोन दिवसापासून लिप्ट बंद आहे रात्री उशीरा पॕकअप झाल्यावर बिल्डिंग जवळ गेल्यावर कळत लिप्ट बंद आहे १६ मजले चढून जावे लागते. लहान मुले तसेच घरात कोणी आजारी असले तर फार हाल होतात. मी माझी पत्नी मुलगा आणि मुलगी असे आम्ही ४ घे इथे राहतो नाईलाजाने मला आईला गावी सोडावं लागलं. आईला १६ मजले चढणं आणि उतरण होत नाही कित्तेक दिवस घरात बसून राहणं तिला जमत देखील नाही. लिफ्ट नीट नाही कधी चालू कधी बंद त्यात पाण्याचे हाल आईला सहन होत नाही. बिल्डिंगचे काम लवकारात लवकर व्हावे अशी अपेक्षा. रेरा हा पर्याय आहे परंतु कितपत न्याय मिळेल आणि किती वेळ लागेल काही सांगता येत नाही.” अभिनेते पांडुरंग भारती यांना होत असलेला त्रास आज अनेक अंडर कन्स्ट्रक्शन फ्लॅट धारक सहन करत आहेत. केस करून देखील त्यांना योग्य तो न्याय मिळत नाही. चित्रकला शिक्षक तसेच चित्रपट, मालिका अभिनेता म्हणून भारती यांनी आपली ओळख बनवली आहे. लक्ष, अस्मिता, जय मल्हार, क्राईम पेट्रोल, डॉक्टर डॉन अश्या अनेक मालिकांत त्यांनी कामे केली आहेत. धग (राष्ट्रिय पारितोषिकविजेता चित्रपट), सुकन्या, ठण ठण गोपाळ, ढोलकी अश्या काही चित्रपटात ते पाहायला मिळाले.