मनोरंजन विश्वातील प्रसिद्ध अभिनेते सयाजी शिंदे यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. काल ११ एप्रिल रोजी साताऱ्यातील प्रतिभा रुग्णालयात त्यांच्या हृदयावर शस्त्रक्रिया करण्यात आली. सयाजी शिंदे यांना काही दिवसांपूर्वी अस्वस्थ जाणवू लागले होते. तेव्हा त्यांनी काही हेल्थ टेस्ट करून घेतल्या होत्या. तेव्हा हृदयातील तीन नसापैकी एका नसमध्ये ९९ टक्के ब्लॉकेज आढळल्याने त्यांच्यावर ताबडतोब शस्त्रक्रिया करण्यात आली होती. डॉ सोमनाथ साबळे यांनी सयाजी शिंदे यांची प्रकृती आता उत्तम असल्याचे सांगितले आहे आणि उपचाराला त्यांनी चांगला प्रतिसाद दिला असल्याचे म्हटले आहे.
सयाजी शिंदे यांना या संकटातून लवकरात लवकर बरं करावं अशी प्रार्थना केली जात आहे. आरोग्याच्या कारणास्तव काही दिवसांपूर्वी सयाजी शिंदे रुटीन चेकअप साठी दवाखान्यात गेले होते. तेव्हा ईसीजी मध्ये काही छोटे प्रॉब्लेम्स आढळले याशिवाय हृदयाच्या एका छोट्या भागाची हालचाल मंदावल्याचे तपासणीत आढळले होते. तेव्हा डॉक्टरांनी सयाजी शिंदे यांना हृदयाची शस्त्रक्रिया करण्याचा सल्ला दिला होता. एका नसमध्ये ब्लॉकेजेस असल्याने हृदय विकाराचा झटका येण्याअगोदरच त्यांच्यावर ही शस्त्रक्रिया करण्यात आली होती त्यामुळे सयाजी शिंदे या धोक्यातून अगोदरच सावरलेले पाहायला मिळाले. दोन तीन दिवसांचे शूटिंग रद्द झाल्याने या दोन दिवसातच शस्त्रक्रिया करण्याचा त्यांनी निर्णय घेतला होता. शस्त्रक्रियेनंतर सयाजी शिंदे यांची प्रकृती उत्तम असल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे.
सयाजी शिंदे हे केवळ अभिनेते म्हणून नाही तर सामाजिक कार्यात देखील त्यांचा मोठा सहभाग आहे. झाडे लावा झाडे जगवा या साठी ते शासनाच्या जागेत वृद्धारोपन करत असतात. पुढच्या पिढीला शुद्ध हवा मिळावी त्यांना मोकळा श्वास घ्यायला यावा या हेतूने त्यांनी ही मोहीम सुरू केली आहे. गावागावात त्यांच्या या उपक्रमाला चांगला प्रतिसाद देखील मिळत असतो. रस्त्यावरची मोठी झाडं तोडण्यापेक्षा ती कशी जगवता येतील यावर त्यांचा भर असतो. त्याचमुळे सयाजी शिंदे यांच्यावर शास्त्रक्रिया पार पडली हे कळताच चाहते त्यांच्या प्रकृतीबाबत विचारपूस करू लागले आहे. पण तूर्तास ही शस्त्रक्रिया केल्यानेच त्यांच्यावरचा मोठा धोका टळला असल्याचे डॉक्टरांनी म्हटले आहे.