news

संत गजानन शेगावीचे मालिकेतील हि चिमुरडी आहे खूपच खास… ऐतिहासिक राजघराण्याचा लाभलाय वारसा

राजघराण्यातील मुली अभिनय क्षेत्रात नशीब आजमावताना दिसतात. सागरिका घाटगे असो किंवा भाग्यश्री पटवर्धन या राजघराण्याचा वारसा लाभलेल्या मुलींनी अभिनय क्षेत्रात एक मोठी उंची गाठली आहे. अशातच राजघराण्याचा वारसा लाभलेली बालकलाकार कु नारायणी सचिन जप्तनमुलुख हीच्या देखील नावाची चर्चा पाहायला मिळत आहे . खरं तर नारायणीला राजघराण्यातील ऐतिहासिक राजे जाधव -जप्तनमुलुख या घराण्याचा वारसा लाभला आहे. पण अभिनयाची आवड असल्याने नारायणीने वयाच्या अवघ्या ४ वर्षा पासुनच आपली अभिनयाची कला जोपासली आहे. जे.जे.स्कुल ऑफ आर्ट्स येथुन जे.डी झालेल्या नारायणीच्या आई विजया पाटणकर-जप्तनमुलुख व आजोबा सुप्रसिद्ध मुर्तीकार कै जगन्नाथ पाटणकर यांच्याकडुन तिला कलेचे बाळकडु मिळाले आहे.

child actress narayani japtanmulukh with father and mother
child actress narayani japtanmulukh with father and mother

नारायणीने वयाच्या चौथ्या वर्षी बालनाट्य तसेच एकपात्री नाट्य स्पर्धेत पहिला क्रमांक पटकावला आहे तसेच शायनी सुपरस्टार २०१९ ची ती विजेती ठरली होती. मिस ओबिडीयंन्ट व मिस पोलो ज्युनियर , मिस ॲनेरजेटिक असे किताब तिला मिळाले आहेत .तिने आभिनय क्षेत्रातील वेगवेगळ्या स्पर्धेत आता पर्यंत ११ सर्टिफिकेटस व मेडल जिकले आहेत.माझे गुरू स्पर्धेत पण प्रथम क्रमांकाची मानकरी होउन तिला चशक व सन्मान चिन्ह प्रदान करण्यात आले होते. यात तिने माझे गुरू आज्जी आजोबा असा विषय निवडला होता. तीला तिची आज्जी खुप प्रिय आहे. छोटा भिम, हॅपी ब्रथडे व जंगली बाना, गेमिंग कट्टा या नाटकात आभिनय केला आहे .मुजरा या शॉर्ट फिल्म व संत गजानन शेगाविचे या मालीकेत तिने बकुळा व पार्वती ची महत्वपूर्ण भुमिका साकारली होती.

narayani japtanmulukh child artist
narayani japtanmulukh child artist

आता येऊ घातलेल्या हिंदी व मराठी फिल्म डाॅ हेडगेवार या चित्रपटात ती त्यांच्या मोठ्या बहिणीच्या बालपणीच्या भुमिकेत दिसनार आहे . तसेच योगिराज गगनगिरी या गगनगिरी महाराजांच्या जिवनावर आधारीत वेब सिरीज मधे ज्याची निर्मिती अमोल देसाई करणार आहेत त्यात तिची महत्वाची भुमिका असणार आहे. नारायणी उत्तम डान्स करते तिला गायनाची देखील आवड आहे. शिकून मोठं व्हावं कलेक्टर व्हावं अशी तिची ईच्छा आहे पण सोबतच अभिनयाची आवड देखील तिला जपायची आहे. विश्वगौरवांकित सदगुरू गगनगिरी महाराजांचा जन्म ज्या मनदुरे पाटणकर राज कुळात झाला ते पाटणकर घराणे मनदुरे नारायनीचे आजोळ आहे

eknath shinde and avdhoot gupte with narayani japtanmulukh
eknath shinde and avdhoot gupte with narayani japtanmulukh

. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नि तिच कौतुक केलेय गायक आवधुत गुप्ते. व आभिनेते महेश कोठारे भरत जाधव .कीशोरी आंबीये यानी पण तिचे कौतुक केले आहे .डाॅ डि.वाय.पाटिल यानी पण तिचे कौतुक केले आहे.नारायणी ने आत्ता पर्यंत प्रसिद्ध आभिनेते डाॅ विलास उजवने.अंजली उजवने .सविता मालपेकर सुकन्या काळन आशा कलाकारांच्या सोबत आभिनयाची संधी तिला लाभली आहे. नारायणी उत्तम डान्स करते तिला गायनाची देखील आवड आहे. शिकून मोठं व्हावं कलेक्टर व्हावं अशी तिची ईच्छा आहे पण सोबतच अभिनयाची आवड देखील तिला जपायची आहे. एवढ्या कमी वयात नारायणीने गाठलेलं हे यश नक्कीच कौतुकास्पद आहे. तिने व्यक्त केलेल्या इच्छा भविष्यात नक्कीच पूर्ण होतील अशी आशा आहे.एवढ्या कमी वयात नारायणीने गाठलेलं हे यश नक्कीच कौतुकास्पद आहे. तिने व्यक्त केलेल्या इच्छा भविष्यात नक्कीच पूर्ण होतील अशी आशा आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button