काल अभिनेत्री आदिती सारंगधर हिने ओला ड्रायव्हरच्या गौरवर्तणुकीचा व त्याच्या अरेरावी भाषेत उत्तरं देण्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला होता. प्रचंड उन्हाळा त्यात एसी बंद केल्याने आदिती सारंगधर ओला ड्रायव्हरवर भडकली होती. त्याला तिने एसी वाढवण्यासाठी सांगितले पण त्या ड्रायव्हरने काच बंद करा मग एसी लावतो असे उत्तर दिले. ओला ड्रायव्हरची ही अरेरावीची भाषा पाहून आदितीने त्याचा व्हिडीओ बनवला आणि चुकीची वागणूक मिळाल्याने तिने गाडी पोलीस स्टेशनमध्ये घ्यायला लावली. आदिती सारंगधर हिचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे. पण या व्हिडिओत आदिती सारंगधरलाच नेटकऱ्यांनी धारेवर धरलेलं पाहायला मिळत आहे.
ड्रायव्हर स्पष्टपणे म्हणतोय की, “तुम्ही काच बंद करा मी एसी वाढवतो.” आता गाडीची काच बंद केल्याशिवाय ड्रायव्हर एसी कसं लावणार हा मुद्दा नेटकऱ्यांनी उचलून धरला आहे. यात ड्रायव्हरची अजिबातच चूक नाही असेही निदर्शनास आणून दिले आहे. आदीतीने अरेरावीची भाषा वापरायला नको होती असेही टीकाकारांनी म्हटले आहे. यावर आता आदिती सारंगधर हिने सर्व मुद्दे विस्तृतपणे सांगून यामागचे स्पष्टीकरणही दिले आहे. जे लोकं गाडीची खिडकी बंद करा म्हणतायेत त्यांना आदिती सारंगधर हिने उत्तर देताना म्हंटले आहे की, ” खिडकी बंदच होती तरीही १ च्या वर एसी करणार नाही असं तो बोलला. मी आणि माझा स्टाफ दिलेल्या लोकेशनवर त्याची वाट पाहत होतो, हा चुकून वेगळ्याच लोकेशनवर गेला आणि माझे ७ मिनिटं वेस्ट केले असं बोलला.
अत्यंत उद्धट आणि उद्दाम वागणं…अस्वच्छ आणि घाण वास येणारी गाडी….काचा बंद आणि एसी नीट चालू नसल्याने मला त्या वासाने त्रास झाला. मळमळ आणि उलटी सारखं वाटल्याने मी २ मिनिटं खिडकी उघडली आणि एसी सुरू ठेवायला सांगितला. त्यानंतर त्याने एसी बंद च करून ठेवला. सुरू करायचा प्रयत्न केला तर धक्काबुक्की…’जमत नसेल तर गाडी कॅन्सल करा आणि उतरा गाडीतून’ अशी आगाऊ भाषा….कम्प्लेन्ट करणार म्हटलं तर ‘हो करा करा तुम्हाला काय करायचं ते करा’ अशी उत्तरं…हा नालायकपणा नाही तर का आहे?…अशावेळी काय करणं अपेक्षित आहे?…” असे म्हणत आदिती सारंगधर हिने घडलेल्या उघटनेचा उलगडा केला आहे.