किशोरी अंबिये माझी खरी आई नाहीये तर त्या माझ्या … शुभविवाह मालिकेतील अभिनेत्रीनं केलं नातं उघड
किशोरी अंबिये या गेली अनेक दशकं मराठी सृष्टीत कार्यरत आहेत. झपाटलेला चित्रपटात त्यांनी महेश कोठारे यांची नायिका साकारली होती. त्यानंतर आताच्या घडीला त्या अनेक मालिकांमधून वेगवेगळ्या भूमिका साकारताना दिसत आहेत. कधी खोडकर , कधी विरोधी, तर कधी नायिकेची आई अशा भूमिकेतून त्या मालिका विश्वात पाय घट्ट रोवून उभ्या आहेत. पण एवढे दिवस या सृष्टीत काम केल्यानंतर किशोरी अंबिये यांचं खाजगी आयुष्य चाहत्यांपासून लपवून राहिलं. अभिनेत्री किशोरी अंबिये यांच्या खऱ्या आयुष्यात त्या कश्या आहेत त्यांच्या फॅमिलीत कोण कोण आहे हे जवळपास कोणालाच माहित नाही आपण ज्यांना रोज छोट्या पडद्यावर पाहतो त्या खऱ्या आयुष्यात कश्या आहेत ह्याची उत्सुकता सर्वानाच लागून असते. किशोरी अंबिये सोशल मीडियावर चांगल्याच ऍक्टिव्ह असल्या तरी त्यांनी कधी खरं आयुष्य मीडियासमोर मांडत नाही.
काही दिवसांपूर्वी अभिनेत्री त्यांनी मराठी सृष्टीत कार्यरत असलेल्या लेकीची ओळख करून दिली. अभिनेत्री काजल पाटील हिने किशोरी अंबिये यांच्या सोबतचा एक खास फोटो शेअर केला. हॅश टॅग लाईक मदर लाईक डॉटर म्हणत काजलने ‘आज मी जे काही आहे ते फक्त तुझ्या पाठिंब्यामुळेच’ किशोरी आंबिये यांचे आभार मानले आहेत. त्यावर अनेकांनी त्यांना तुम्ही खऱ्या आयुष्यात मायलेकी आहात का? असा प्रश्न विचारला तेव्हा किशोरी अंबिये यांनी स्वतःच या गोष्टीचा खुलासा करताना हो, ती माझी मुलगी आहे असे म्हटले होते. खरं तर किशोरी अंबिये आणि काजल पाटील या दोघींनी कुलस्वामिनी या मालिकेतून एकत्रित काम केले होते. माय लेकीच्या भूमिकेत या दोघी झळकल्या होत्या, त्यामुळे दोघींमध्ये एक छान बॉंडिंग जुळून आलेले होते. तेव्हापासून आई आणि लेक असेच नाते ते आजही जपताना पाहायला मिळत आहेत. पण ह्या फोटोमुळे चांगलाच गोंधळ उडाला खऱ्या आयुष्यातही त्या आईच आहेत असा अनेकांचा समज झाला ह्यावर स्पष्टीकरण देताना अभिनेत्री काजल म्हणते, “कुलस्वामिनी ह्या मालिकेत किशोरी अंबिये ह्या माझ्या मालिकेतील आई होत्या.
त्यानी मला खूप मदत केलीय मी पुण्याची असून मुंबईला शूटिंगला जायचे सेटवर त्या रोज माझ्यासाठी जेवण घेऊन यायच्या. अभिनयातील बऱ्याच गोष्टी मी तिच्याकडूनच शिकले आहे. माझ्या आईच नाव अर्चना पाटील आहे आणि इंडस्ट्रीतील आई किशू मम्माच आहे. किशोरी मम्माने मला खूप काही शिकवलं आहे. काजल पाटील ही कॉलेजमध्ये असल्यापासूनच नाटकातून काम करत असे. अथर्व पाटील हा तिला एक भाऊ आहे सध्या तो शिक्षणासाठी परदेशात गेला आहे. कुलस्वामिनी मालिकेत काजलच्या अभिनयाला पुरेसा वाव मिळाला होता. तुझ्यात जीव रंगला, काय घडलं त्या रात्री, शुभ विवाह अशा मालिकेतून काजलने आतापर्यंत अनेक महत्वपूर्ण भूमिका साकारल्या आहेत. या प्रवासात किशोरी अंबिये यांची तिला नेहमीच साथ मिळत असते. म्हणूनच तिने दोघींचा एक खास फोटो शेअर करून ही पोस्ट लिहिली आहे.