मुंबईमध्ये बॉलीवुड तसेच मराठी कलाकार होळीच्या दिवशी रंगपंचमी साजरी करतात .मुंबई पोठोपाठ आता सातारा मध्येही सिरीअल आणी सिनेमाची शुटींग जोरदार सुरू असतात त्यामुळे कलाकारांची संख्या सातारा जिल्ह्यात वाढली आहे .यंदा प्रथमच मुंबई प्रमाणे सातारा जिल्ह्यात रंगोत्सव २०२४ या नावाने रंगपंचमी साजरी केली. उंबरजच्या सरोवर हॉटेल च्या प्रशस्त लॉन वर सर्व कलाकारांनी प्रचंड उत्साहात एकमेकाला रंग लावून नाच गाण्यांवर ठेका धरत रंगपंचमी साजरी केली .त्या मधे रोहीत चव्हाण, डॉ. शशि डोईफोडे, मोनालिसा बागल, वासू पाटील, अश्विनी बागल, अनुप जगदाळे, नटराज शिंदे, सत्यान शिखरे, पोपट सानप आणी यासारखेच अनेक सातारा चित्रनगरीतील नामांकीत कलाकारांनी आवर्जून उपस्थिती दर्शवली होती.
२४ मार्च रोजी होळीचे औचित्य साधून दुपारी ४ वाजता सातारा जिल्ह्यातील कलाकारांनी कलाकारांसाठी “रंगोत्सव २०२४” चे आयोजन केले होते. अनेक कलाकारांनी हजेरी लावत ह्या सोहळ्यात रंगत आणली तर ज्या कलाकारांना येता आलं नाही त्यांनीही शुभेच्छा संदेशाचा व्हिडिओ शेअर करून सोहळ्याला पाठिंबा दिला. साताऱ्यात प्रथमच असा कार्यक्रम पार पडला आता इथूनपुढे दरवर्षी असा सोहळा आयोजित व्हावा असं मत देखील व्यक्त केलं गेलं. सातारा जिल्ह्यातील कलाकारांनी केवळ प्रेक्षकांचे मनोरंजनच केले नाही तर सातारा जिल्ह्यात मालिकेच्या शूटिंगला प्रोत्साहन सुद्धा मिळवून दिले आहे.
झी मराठी, स्टार प्रवाह, सोनी मराठी, सन मराठी यांसारख्या चायनलवर ज्या मालिका चालतात त्यातील बऱ्याचश्या मालिका आज साताऱ्यात शूट होताना पाहायला मिळत आहेत. निसर्गाने वेढलेल्या आणि ऐतिहासिक वारसा लाभलेल्या साताऱ्यातील कलाकारांनी त्यांच्या मेहनतीने आज हे यश संपादन केलं आहे. महाबळेश्वर, वाई सारख्या ठिकाणांची भुरळ तर बॉलीवूडला देखील आपल्याकडे खेचून आणताना पाहायला मिळते.