अभिनेत्री स्पृहा जोशी ही सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय पाहायला मिळते. अनेकदा ती तिच्या इन्स्टाग्रामवरून रोजचे अपडेट चाहत्यांसोबत शेअर करत असते. स्पृहा जोशी ही अस्सल नॉनव्हेज प्रेमी आहे. खेकडा, मासे, बोंबील असे सर्व गोष्टी ती खूप आवडीने खात असते. गॅसवर बोंबील भाजून बनवलेली तिची रेसिपी तर खूपच व्हायरल झाली होती पण यामुळे तिला ट्रोलिंगाचा सामना करावा लागला होता. तू ब्राह्मण असून खेकडा, मासे, बोंबील खातेस?…धर्म बुडवला, तुला हे शोभत नाही. अशा अनेक प्रतिक्रिया तिला यावर मिळत असतात. पण आता स्पृहाने या ट्रोलर्सना एक उत्तर दिलेलं पाहायला मिळत आहे.
स्पृहाने काही दिवसांपूर्वी एक मुलाखत दिली होती. त्यात तिने मी नॉनव्हेज प्रेमी असल्याचे म्हटले होते. स्पृहाच्या आजीने लिहिलेली रेसिपीजची एक वही तिच्याकडे आहे त्यामुळे लग्नाआधी स्वयंपाक घरात पाऊल न टाकणारी स्पृहा आता उत्तम स्वयंपाक बनवते असे ती त्यात म्हणते. स्पृहाच्या घरी सगळेच नॉनव्हेज खातात पण फक्त वडील त्यापासून थोडेसे लांब आहेत. नॉनव्हेज खाण्यामागचे कारण सांगताना ती म्हणते की, “आमच्या घरी सगळे स्पोर्ट्स प्लेअर आहेत, माझे आजोबा बॅडमिंटन प्लेअर होते. माझी बहिण आणि मी स्वतः खेळात सहभाग घ्यायचो. त्यामुळे डाएट साठी नॉनव्हेज खाणं खूप गरजेचं असतं. म्हणून आमच्या घरात नॉनव्हेज बनवलं जातं पण माझे बाबा व्हेजिटेरियन आहेत. मी, माझी बहिण आणि आई आम्ही तिघी कट्टर नॉनव्हेज प्रेमी आहोत, माझ्या आईकडून ती आवड आमच्याकडे पास झाली असं म्हणायला हरकत नाही.
बाबा नॉनव्हेज खात नसले तरी दर विकेंडला ते आम्हाला नवनवीन ठिकाणी नॉनव्हेज खायला घेऊन जायचे. ” स्पृहा जोशी हिची बहीण क्षिप्रा जोशी ही एक नॅशनल लेव्हल जिम्नॅस्टिक प्लेअर आहे. या खेळात तिची अनेकदा परीक्षक पदीही नेमणूक करण्यात आली होती. त्यामुळे तुम्हाला ऍक्टिव्ह राहायचं असेल तर नॉनव्हेज खाणं तेवढंच गरजेचं असतं ही गरज ओळखूनच त्यांच्या घरात नॉनव्हेज बनवलं आणि खाल्लं जाऊ लागलं. दरम्यान सृहा जोशी आता सागर देशमुख सोबत कलर्स मराठीच्या मालिकेतून प्रमुख भूमिका साकारत आहे. या नवीन मालिकेसाठी तिला मनःपूर्वक शुभेच्छा.