आम्ही आमच्या कृतीतून त्यांची तोंड बंद केली आहेत ज्यांनी आम्हाला ही प्रश्न लहानपणापासून विचारली आहेत
आपल्या घरातील वादविवाद, भांडणाबद्दल जेव्हा शेजारीपाजारी चर्चा केली जाते तेव्हा अशा लोकांना काय उत्तर द्यायचं हे त्यावेळी कळत नसतं. पण आपण संयमीत राहून आपल्या कृतीतून त्यांचं तोंड बंद करू शकतो असं मत सिद्धार्थ चांदेकर याने व्यक्त केलं आहे. सिध्दार्थ चांदेकर याची आई सीमा चांदेकर या गेल्याच काही महिन्यांपूर्वी दुसऱ्यांदा विवाहबद्ध झाल्या होत्या. यावरून मीडिया माध्यमातून अनेकदा सिध्दार्थला त्याच्या पहिल्या वडीलांबद्दल प्रश्न विचारण्यात आले मात्र नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत त्याने यावर मौन सोडलेलं पाहायला मिळत आहे. सीमा चांदेकर या अभिनेत्री आहेत सोबतच त्या घरगुती बनवलेल्या विविध खाद्यपदार्थ विक्रीचा व्यवसाय करतात. सिद्धार्थला एक मोठी बहीण देखील आहे. घटस्फोटानंतर सीमा चांदेकर यांनी त्यांच्या दोन्ही मुलांचे पालनपोषण केले.
नवऱ्याच्या सततच्या वादाला आणि भांडणाला कंटाळून त्यांनी हा निर्णय घेतला होता. सिध्दार्थला त्याचे वडील आता कुठे असतात काय करतात हे ठाऊक नाहीये. कारण खूप कमी वयातच त्याचे आईवडील विभक्त झाले होते. पण त्यावेळी शेजारचे लोक आई वडीलांमध्ये झालेल्या भांडणाबद्दल त्याला विचारायचे. तेव्हा आपल्याच घरात भांडणं होतात आणि ही आपली चूक आहे अशी त्याची समजूत झाली होती. भिंतीला लागूनच भिंत असल्याने शेजाऱ्यांना त्यांच्या घरातील भांडणाबद्दल सगळं काही माहीत असायचं पण मुद्दामहून ते शेजारी सिध्दार्थकडे याची चौकशी करायचे. तेव्हा या लोकांना काय उत्तर द्यायचं असा प्रश्न त्याला पडलेला असायचा. काय मग वडील कुठंयेत ? कसलं भांडण चाललं होतं? असे प्रश्न सिद्धार्थ आणि त्याच्या बहिणीला विचारण्यात येऊ लागले. याबद्दल सिद्धार्थ म्हणतो की , त्यावेळी आमच्याकडे कुठलंही पाठबळ नाही कारण आपली फॅमिली अशी आहे , त्यावेळी असं वाटायचं की ही आपलीच चूक आहे.
पण आता मला असं वाटतंय या सगळ्यांना उत्तरं द्यायची गरजच नाहीये. शब्दांच्या उत्तरापेक्षा कृतीचं उत्तर फारसं महत्वाचं आहे. मी, माझी बहिण आणि आई आम्ही तिघांनी हे आमच्या कृतीतून त्यांची तोंड बंद केली आहेत ज्यांनी आम्हालाही प्रश्न लहानपणापासून विचारली आहेत. आम्ही आमचं काम प्रामाणिकपणे करतो आहोत आणि आम्ही आमची फॅमिली जपत आहोत. हे उत्तर आहे माझं जे मला असे प्रश्न विचारतात.” आज सिद्धार्थने मराठी फिल्म इंडस्ट्रीत आपला ठसा उमठवला आहे एक उत्तम अभिनेता म्हणून तो प्रसिद्धीच्या झोतात असला तरी तो व्यक्ती म्हणून हि तितकाच उत्तम आणि समंजस आहे हे त्याच्या प्रत्येक गोष्टीतून पाहायला देखील मिळत.