ज्येष्ठ अभिनेत्री उषा चव्हाण यांचे पुण्यातील पॅलेस … गेल्या १३ वर्षांपासून लग्न मुंज रिसेप्शन सोहळ्यासाठी उत्तम ठिकाण
दादा कोंडके यांच्या चित्रपटातून नायिका बनून मराठी सृष्टीचा एक काळ ज्येष्ठ अभिनेत्री उषा चव्हाण यांनी गाजवलेला पाहायला मिळाला. खरं तर उषा चव्हाण यांचे आईवडिल कलावंत लोकनाट्य, नाटकातून ते काम करत असत. अशातच उषा चव्हाण यांनी देखील हे गुण अंगिकारले होते. नृत्याची विशेष आवड असल्याने त्या लोकनाट्यातून काम करत असत. एकदा असेच बसस्टॉपवर असताना दादा कोंडके यांची नजर उषा चव्हाण यांच्यावर पडली. आणि त्यांनी आपल्या चित्रपटात प्रमुख नायिकेची भूमिका देऊ केली. सोंगाड्या चित्रपटातून उषा चव्हाण यांनी मोठ्या पडद्यावर पाऊल टाकले होते. हिंदी, मराठी, तमिळ अशा चित्रपटातून त्यांनी आपल्या अभिनयाची आणि उत्कृष्ट नृत्यांगनाची चुणूक दाखवून दिली होती.
अभिनय चित्र या निर्मिती संस्थेतून उषा चव्हाण यांनी काही चित्रपट आणि मालिकेची निर्मिती देखील केली. पुण्यातील नामवंत जमीनदार दत्तात्रय कडूदेशमुख यांच्याशी त्या विवाहबंधनात अडकल्या. पुण्यात त्यांची २६ एकरहून अधिक शेती असल्याचे सांगितले जाते. हृदयनाथ कडूदेशमुख हा त्यांचा एकुलता एक मुलगा बांधकाम व्यवसाय क्षेत्रात कार्यरत आहे. गेल्या अनेक वर्षांपासून धनकवडी परिसरात उषा चव्हाण आणि त्यांचे कुटुंब वास्तव्यास आहे. इथे जवळच “उषा पॅलेस” नावाने त्यांचे प्रशस्त असे दोन मजली कार्यालय आहे. लग्न, मुंज, रिसेप्शन, वाढदिवस सोहळा, बारसं अशा वेगवेगळ्या सोहळ्यासाठी हे कार्यालय धनकवडी परिसरात खूप प्रसिद्ध आहे. १९ ऑगस्ट २०१० साली उषा चव्हाण यांनी हे पॅलेस उभारले होते. याला आता जवळपास १३ वर्षे पूर्ण झाली आहेत
गेल्या १३ वर्षांपासून उषा चव्हाण यांची महसूल संदर्भात काही कामं रखडली होती ही कामं नुकतीच मार्गी लागल्याने त्यांनी एकनाथ शिंदे यांचे आभार मानले होते. याच मालमत्ता संदर्भात त्यांच्यात काही अडचणी निर्माण झाल्या होत्या त्या एकनाथ शिंदे यांच्या मध्यस्तीने मार्गी लागलेल्या पाहायला मिळाल्या. पुण्यातील धनकवडी येथील तीन हत्ती चौकाच्या जवळच हे पॅलेस असल्याने अनेकांची या पॅलेसला पहिली पसंती मिळते. ५०० माणसांची क्षमता असलेल्या त्यांच्या कार्यलयात जेवणासाठी आणि सोहळ्यासाठी वेगवेगळी उपाययोजना करण्यात आली आहे. अंदाजे ४० फोर व्हीलर आणि १५० टू व्हीलर गाड्यांची प्रशस्त पार्किंगची सुविधा याठिकाणी उपलब्ध करून दिली आहे. सामान्यांच्या खिशाला परवडेल असे हे सोयीस्कर ठिकाण असल्याने अनेकांनी या ठिकाणाला पसंती दर्शवली आहे. गेल्या १३ वर्षांपासून या पॅलेसमध्ये लग्न, वाढदिवस, मुंज, बारसं, रिसेप्शन असे वेगवेगळे सोहळे पार पडले आहेत.