प्रिवेडिंग फोटो शूट करताना अचानक मुलीच्या अंगावर आला साप … होणाऱ्या नवऱ्याने धैर्य दाखवल्याने मोठा अनर्थ टाळला
सध्या प्रिवेडिंग फोटो शूटचे फॅड सगळीडेच पाहायला मिळत आहे. या प्रिवेडिंगच्या खास आठवणी लक्षात राहाव्यात म्हणून तितक्याच खास ठिकाणांची निवड केली जात आहे. असेच एक प्रिवेडिंग फोटोशूट सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरले आहे. कारण ज्या ठिकाणी हे फोटोशूट करण्यात येत होते तिथे चक्क साप आल्याचे कॅमेऱ्यामनच्या लक्षात आले. हा व्हिडीओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे आणि सोबतच शूट करून घेणाऱ्या कपलचे देखील कौतुक केले जात आहे. व्हायरल होणारा हा व्हिडीओ नेमका कुठला आहे हे स्पष्ट झालेले नाही. मात्र साप जवळ येऊनही कुठलाही आरडाओरडा न करता हे कपल शांतपणे तो साप जाण्याची वाट पाहत होते. हा व्हिडीओ रात्री शूट करण्यात आला होता. प्रिवेडिंग फोटोशूट साठी आयोजकांनी एका उथळ नदीच्या पात्राची निवड केली होती. रात्रीच्या अंधारात हे कपल नटून सजून त्या नदीच्या पाण्यात जाऊन बसले होते.
जवळच कॅमेरामन आणि त्याचे दोन सहाय्यक त्याठिकाणी उपस्थित होते. फेसाळत्या पाण्याच्या प्रवाहात बसलेल्या कपलजवळ अचानक एक साप येतो. त्या मुलाच्या हे लक्षात आल्यानंतर तो तिच्या होणाऱ्या बायकोला शांत बसायला सांगतो आणि तिला धीर देतो. बाकीचे तिघेही जवळ साप असल्याचे त्यांना सांगतात. त्याचवेळी तो साप कॅमेरामन जवळ येऊन पुन्हा मागे फिरतो. तेव्हा त्या मुलीच्या हातावरून तो साप पुढे निघून जातो. आता आपल्या अंगावरून साप चाललाय हे त्या मुलीच्याही लक्षात येते ती मोठ्याने ओरडण्याचा प्रयत्न करते पण हातात हात असलेल्या जोडीदाराची तिला भक्कम साथ मिळते. त्यामुळे ती मुलगीही न हलता एकाच जागी शांत बसून राहते. साप गेल्यानंतर मात्र सगळेचजण सुटकेचा निश्वास टाकतात. हा व्हिडीओ पाहणारे नेटकरी त्या मुलाचे मोठे कौतुक करताना दिसत आहे. साप जवळ असतानाही तो त्या मुलीला सोडून बाजूला गेला नाही किंवा त्या मुलीनेही आरडाओरडा न करता त्याचे म्हणणे ऐकून घेतले. त्यामुळे दोघांच्याही संयमीत भूमिकेचे इथे कौतुक केले जात आहे.
आयुष्यात असाच जोडीदार हवा जो तुमच्या सुखदुःखात तुमची साथ सोडून जाणार नाही. अशी प्रतिक्रिया या व्हिडिओवर नेटकऱ्यांनी दिली आहे. तर त्या मुलीचा जोडीदारावरचा विश्वास देखील तेवढाच महत्वाचा मानला जात आहे. त्याच्यावर विश्वास असल्यामुळेच ती मुलगी तिथे त्याच्याजवळ बसून राहिली होती. या मुलाच्या जागी दुसरा कोणी असता तर तो त्या मुलीला तिथेच सोडून पळून गेला असता. पण गटाने तसे न करता परिस्थितीला शांतपणे तोंड दिले आणि यातूनच सगळ्यांवरचे संकट त्याने दूर केलेले पाहायला मिळाले. अर्थात तो साप विषारी होता की बिनविषारी ही गोष्ट इथे गौण मानावी लागेल.