news

प्रथमेश परब आणि क्षितिजाचा थाटात पार पडला साखरपुडा… साखरपुड्याचे फोटो होत आहेत व्हायरल

अभिनेता प्रथमेश परब आणि त्याची गर्लफ्रेंड क्षितिजा घोसाळकर आज १४ फेब्रुवारी रोजी म्हणजेच व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी एंगेज झाले आहेत. क्षितिजा आणि प्रथमेश व्हॅलेंटाईन डे ला साखरपुडा करताहेत हे त्यांनी सोशल मीडियावर जाहीर केले होते. गेल्या चार वर्षांपासून एकमेकांना ते डेट करत होते. त्यानंतरचा प्रत्येक व्हॅलेंटाईन डे त्यांच्यासाठी खास राहिला आहे. त्याचमुळे आम्ही दोघे या खास दिवशी साखरपुडा करतोय असे क्षितिजाने जाहीर केले होते. दरम्यान क्षितिजा आणि प्रथमेशच्या साखरपुड्याचे खास क्षण सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. क्षितिजाने यावेळी जांभळ्या रंगाची पैठणी तर प्रथमेशने ऑफ व्हाइट रंगाचा कुर्ता परिधान केला होता. गुडघ्यावर बसून सिनेस्टाईलने प्रथमेशने क्षितिजाच्या बोटात अंगठी घातली होती. या साखरपुड्यात जवळच्या नातेवाईकांसह मराठी सेलिब्रिटींनी देखील हजेरी लावली होती.

prathmesh parab and kshitija wedding engagement
prathmesh parab and kshitija wedding engagement

९ फेब्रुवारी रोजी प्रथमेशची प्रमुख भूमिका असलेला डिलिव्हरी बॉय हा चित्रपट प्रदर्शित झाला. त्याला प्रेक्षकांकडून खूप चांगला प्रतिसाद मिळत आहे. प्रथमेश गेली अनेक वर्षे मराठी चित्रपट सृष्टीशी जोडलेला आहे. टाईमपास चित्रपटाने त्याला मोठी लोकप्रियता मिळवून दिली होती. त्यानंतर तो तिन्ही सिकवलचा भाग बनला होता. खरं तर हँडसम, डॅशिंग नायकाला बगल देत त्याने या इंडस्ट्रीत स्वतःची नायक म्हणून एक वेगळी बनवली. असा कुठे नायक असतो का? असे टोमणेही त्याने खाल्ले होते. पण प्रेक्षकांचे प्रेम त्याला मिळाल्याने यशाचा एकेक टप्पा तो सहज पार करत गेला. अशातच क्षितिजा घोसाळकर सारखी उच्च शिक्षित तरुणी त्याच्या आयुष्यात आली. बायोटेक्नॉलॉजी विषयात क्षितिजाने मास्टर्स केलं आहे.

prathamesh parab and kshitija ghosalkar wedding engagement pics
prathamesh parab and kshitija ghosalkar wedding engagement pics

भाभा ऑटोमिक रिसर्च सेंटरमध्ये ब्रेस्ट कॅन्सर आणि लँग्ज कॅन्सरवर तिने प्रोजेक्ट बनवलेले आहेत. एनजीओ साठीही क्षितिजा काम करते आहे.. कोटक एज्युकेशन फाउंडेशन या सामाजिक संस्थेशी ती जोडली गेली आहे. आणि यातच तिची करिअर करण्याची इच्छा आहे. कॉलेजपासून सुरू झालेल्या त्यांच्या या मैत्रीचा प्रवास आज नात्याच्या बंधनात अडकला आहे. त्यांच्या लग्नाचीही जोरदार तयारी सुरू असून लवकरच ते विवाहबद्ध होणार आहेत. तूर्तास प्रथमेश परब आणि क्षितिजा घोसाळकर यांना साखरपुड्याच्या मनःपूर्वक शुभेच्छा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button