लोकं मला अजूनही होम ब्रेकर म्हणतात…पहिल्या पत्नीबद्दल खुलासा करताना म्हणाल्या तेंव्हा मी १९ वर्षांची होती आमच्या वयात
अभिनेत्री प्रिया बेर्डे यांनी नुकतीच एक मुलाखत दिली आहे. या मुलाखतीत त्या अभिनय क्षेत्रातील प्रवासाबद्दल आणि नेपोटीझम बद्दल भरभरून बोलताना दिसल्या. याच मुलाखतीत त्यांनी लक्ष्मीकांत बेर्डे यांच्या प्रेमात कशा पडल्या याचाही किस्सा शेअर केला आहे. प्रिया बेर्डे यांची आई लता अरुण या नाट्य, चित्रपट अभिनेत्री. तर त्यांची मामी माया जाधव या प्रसिद्ध नृत्यांगना. प्रिया बेर्डे लहान असल्यापासूनच माया जाधव यांच्यासोबत कार्यक्रमाला जात होत्या. मामींनी केलेला डान्स पाहूनच प्रिया बेर्डे डान्स शिकल्या होत्या. वयाच्या १४ व्या वर्षी माया जाधव यांच्यासोबत परदेशात जाऊन प्रिया बेर्डे यांनी कार्यक्रमांचे सादरीकरण केले होते. अशोक सराफ आणि लता अरुण यांनी एकत्रितपणे काम केले होते त्यामुळे अशोक मामानीच मला कित्येकदा अंगाखांद्यावर खेळवलंय असे प्रिया बेर्डे सांगतात.
वयाच्या १८ व्या वर्षी प्रिया बेर्डे यांनी वाडीलांच्याच चित्रपटात डबिंग आर्टिस्ट म्हणून काम करायला सुरुवात केली. त्यावेळी लक्ष्मीकांत बेर्डे यांचं इंडस्ट्रीत नाव झालं होतं त्यांच्या आजूबाजूला नेहमी स्पॉटबॉय, मेकअपमन अशी माणसं असायची त्यामुळे या व्यक्तीच कौतुकच वेगळं असे म्हणत प्रिया बेर्डे लक्ष्मीकांत पासून काहीशा लांबच राहत होत्या. पण मग दोघांची ओळख कशी वाढली याबद्दल सांगताना त्या म्हणाल्या की, ” आम्ही एकत्र काम करत असताना मला तो गिरगावकर म्हणून त्याच्यातला माणूस जाणवला. मग आमच्यात मैत्री झाली पण त्यावेळी खूप कळतंय असंही माझं वय नव्हतं तेव्हा मी १९ वर्षांची होती. आमच्या वयात १६ ते १७ वर्षांचे अंतर होते. मला माझ्या घराची जबाबदारी सांभाळायची होती त्यामुळे मला काम करणं भाग होतं. मला त्यांचा सपोर्ट मिळाला तेव्हा मी त्यांची मैत्री स्वीकारली. माझ्या आई मध्ये आणि त्यांच्यात खूप छान बॉंडिंग होतं. रुही पण माझ्या आईची चांगली मैत्रीण होती, पण मग असं काही डोक्यात नव्हतं की असं काही होईल. पण माझी आई जेव्हा खूप आजारी पडली तेव्हा मला त्या एकटेपणात आधाराची गरज वाटली.
आईच्या आजारपणात मी त्यांच्या जवळ गेले आणि तेही माझ्या जवळ येत गेले. मला तो माणूस म्हणून कळायला लागला ते स्क्रीनवर जेवढे उथळ वाटतात तसे ते अजिबात नव्हते ते खूप विचारी होते.मी त्यांच्याकडे गुरू म्हणूनही बघत होते माझ्या त्यांच्याबद्दल संमिश्र भावना होत्या. त्या वयात प्रेम असणं ही गोष्टच मला समजत नव्हती. पण लोकं मला आजही होम ब्रेकर म्हणतात. हे काळाच्या ओघात तुमच्या नशिबात ज्या गोष्टी लिहिलेल्या असतात तसं घडतं त्या आपण स्वीकारल्या पाहिजेत. ह्या गोष्टी घडल्यानंतर रुहीचे निधन झाले होते.” लक्ष्मीकांत बेर्डे यांच्या अगोदर रुही बेर्डे यांनी मराठी तसेच हिंदी इंडस्ट्रीत नाव कमावले होते. तेव्हा लक्ष्मीकांत बेर्डे यांचे नाव कुठेच नव्हते. रुहीमुळेच लक्ष्मीकांत बेर्डे यांना पाठिंबा मिळत गेला, याचा खुलासा लक्ष्मीकांत बेर्डे यांनी एका जुन्या मुलाखतीत केला होता. तर रुहीमुळे लक्ष्मीकांतचं नाव झालं ही गोष्ट प्रिया बेर्डे देखील मान्य करतात.