बांगलादेशने क्रिकेट नियमांचा फायदा उठवत विश्वचषक मधील पहिला आऊट…. हेलमेट खराब असल्याने अनेक विनवण्या करूनही शेवटी
आज सोमवार ६ नोव्हेंबर विश्वचषक स्पर्धेतील बांगलादेश आणि श्रीलंका यांच्यात सामना रंगताना पाहायला मिळत आहे. खरंतर आजच्या सामन्यामुळे कोणत्याही संघाला पुढे जाण्यासाठी कोणताच फायदा होणार नाही. हे माहित असूनही आज ग्राऊंडमध्ये एक वेगळाच प्रकार घडताना पाहायला मिळाला. अँजीलो मॅथिव्स हा ग्राऊंडमध्ये बॅटिंग करायला आणि पण त्याच्या हेल्मेटमध्ये काही दोष असल्याने त्याला दुसरं हेल्मेट मागवावे लागलं. पण क्रिकेट नियमानुसार विकेट पडल्यानंतर २ मिनिटाच्या आत बॅट्समन ग्राऊंडमध्ये येऊन बॉल खेळणे गरजेचे असते. पण हेल्मेटमध्ये खराबी आल्याने अँजीलो मॅथिव्सला २ मिनटांहून अधिक वेळ लागला. ह्याच गोष्टीचा फायदा उठवत बांगलादेशचा कॅप्टन शाकिब अल हसन याने अंपायरकडे आऊट दिला जावा ह्यासाठी मागणी केली.
क्रिकेट विश्वात हा नियम असला तरी आजवर कोणत्याही कॅप्टनने ह्याचा फायदा उठवत नवीन बॅट्समनला आऊट घोषित करावं अशी हि पहिलीच घटना आहे. अंपायरने नियमानुसार अँजीलो मॅथिव्स याला आऊट घोषित करताच अँजीलो मॅथिव्स आपला प्रॉब्लेम त्यांना सांगू लागला. अनेक विनंत्या केल्याने त्यांनी हे प्रकरण शाकिबकडे वळवलं. अँजीलो मॅथिव्सने शाकिबला परिस्थिती सांगण्याचा प्रयत्न देखील केला पण शाकिब काही ऐकायला तयार नाही हे पाहता शेवटी नाईलाजाने अँजीलो मॅथिव्सला बाहेर जाणं भाग होत. टाइम आऊट नियमानुसार अँजीलो मॅथिव्स पहिला खेळाडू आहे जो अश्या नियमानुसार आऊट देण्यात आला. श्रीलंका आणि बांगलादेश यांच्यात नेहमीच खुनशीचे सामने पाहायला मिळतात. विश्वचषक स्पर्धेत देखील ह्या दोन्ही संघात वाद होताना पाहायला मिळणार हे देखील तितकंच सत्य.