news

मुग्धा प्रथमेश पाठोपाठ या प्रसिद्ध अभीनेत्रीचा साखरपुडा संपन्न….साखरपुडयाचे फोटो होत आहेत व्हायरल

दोन दिवसांपूर्वी सारेगमप लिटिल चॅम्प्स फेम मुग्धा वैशंपायन आणि प्रथमेश लघाटे यांचा पारंपरिक पद्धतीने साखरपुडा पार पडला. त्याच दिवशी मराठी सृष्टीतील एका प्रसिद्ध अभिनेत्रीनेही साखरपुडा केलेला पाहायला मिळाला. झी मराठी वरील तुला पाहते रे मालिकेतील नायिकेची मैत्रीण रुपाली अर्थात अभिनेत्री सोनल पवार हिचाही रविवारी साखरपुडा संपन्न झाला. सोनल पवार हिने मार्केटिंग क्षेत्रात कार्यरत असलेल्या समीर पौलास्तेची आयुष्यभराचा जोडीदार म्हणून निवड केली. सोनल आणि समीरच्या साखरपुड्याच्या दिवशी मराठी सृष्टीतील काही मोजक्या सेलिब्रिटींनी हजेरी लावलेली पहायला मिळाली.

actress sonal pawar wedding engagement
actress sonal pawar wedding engagement

सोनल पवार साध्य रमा राघव या मालिकेत अश्विनीची भूमिका साकारत आहे. घाडगे अँड सून, सरस्वती, बॉस माझी लाडाची, लाडाची मी लेक गं, तुला पाहते रे अशा लोकप्रिय मालिकांमध्ये काम केलेले आहे. सोनलने बालपण आणि शिक्षण मुंबईतील बोरीवली मध्येच गेले. तिचे शालेय शिक्षण सुविद्या प्रसारक संघ मंगूभाई दत्तानी विद्यालय, बोरीवली येथे झाले. तर फार्मसी पूर्ण केल्यानंतर ती लोटस हॉस्पिटल, मीरा रोड येथे फार्मासिस्ट म्हणून काम करत होती. त्यासोबत ती नाटकातूनही सक्रिय होती. महाविद्यालयीन सांस्कृतिक कार्यक्रमातही ती सहभागी होत होती. झी मराठीवरील ‘अस्मिता’ या मराठी मालिकेतून तिला पहिल्यांदा छोट्या पडद्यावर झळकण्याची संधी मिळाली होती.

sonal pawar wedding engagement pics
sonal pawar wedding engagement pics

झी युवावरील शौर्य, झी मराठीवरील खुलता कळी खुलेना मालिकेसाठी तिने महत्वपूर्ण भूमिका साकारल्या होत्या. फार्मासिस्ट असलेल्या सोनलला या प्रोफेशनल लाईफ पेक्षा अभिनय क्षेत्राची ओढ जास्त होती. त्यामुळे काही काळ फार्मासिस्ट म्हणून भूमिका बाजावल्यानंतर ती पूर्णवेळ अभिनेत्री म्हणून काम करू लागली. तर समीर पौलास्ते हा देखील मराठी इंडस्ट्रीत कार्यरत आहे. विठ्ठला तूच, वेगळी वाट, चंद्रमुखी , ये रे ये रे पावसा अशा चित्रपटासाठी त्याने मार्केटींगचे काम केले आहे. सोनल आणि समीरच्या साखरपुड्यानिमित्त त्यांच्यावर सेलिब्रिटींनी अभिनंदनाचा वर्षाव करण्यास सुरुवात केली आहे. आयुष्याच्या या नवीन प्रवासासाठी सोनल आणि समीरला खूप खूप शुभेच्छा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button