news

बांधकाम क्षेत्रात नाव कमवत असलेल्या या अभिनेत्रीला ओळखलंत.. एककाळ मराठी चित्रपट सृष्टी गाजवली होती

मराठी सृष्टीतील प्रसिद्ध अभिनेते भरत जाधव यांनी एक काळ चांगलाच गाजवला होता. अनेक नवख्या नायिकांना त्यांच्यासोबत काम करण्याची संधी मिळाली होती. २००९ साली भरत जाधव यांची प्रमुख भूमिका असलेला ‘लग्नाची वरात लंडनच्या घरात’ हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. या चित्रपटात दीपाली सय्यद, प्रेमा किरण, चेतन दळवी, रमेश भाटकर असे नामवंत कलाकार झळकले होते. अशातच वृषाली हटाळकर हिनेही या चित्रपटात सहाय्यक भूमिका साकारलेली पाहायला मिळाली. या चित्रपटानंतर वृषाली हटाळकरला आणखी काही चित्रपटात प्रमुख भूमिका ते सहाय्यक भूमिकेत झळकल्या. मात्र आता अभिनयाच्या जोडीलाच तिने वेगळ्या क्षेत्रात उतरण्याचे धाडस दाखवले आहे. वृषाली हटाळकर सध्या काय करते याबद्दल अधिक जाणून घेऊयात…

Vrushali Hatalkar actress
Vrushali Hatalkar actress

वृषाली हटाळकर ही मूळची नाशिकची. नाशिकच्या गव्हर्नमेंट गर्ल्स हायस्कूल मधून तिने शालेय शिक्षण घेतले पुढे केटीएचएम कॉलेजमधून तिने बीकॉमचे शिक्षण घेतले. अभिनयाची आवड सुरुवातीपासूनच होती त्यामुळे काम मिळवण्यासाठी तिने ऑडिशन देण्यास सुरुवात केली. प्रथमच बॉलिवूड चित्रपटात तिला झळकण्याची संधी मिळाली ती सुभाष घई यांच्या चित्रपटातून. ‘किसना’ या चित्रपटात तिने विवेक ओबेरॉय सोबत काम केले यात तिने एक डायलॉग म्हटला होता. वृषालीचा अभिनयाचा प्रवास इथूनच सुरू झाला. डम डम डिगा डिगा या चित्रपटाने वृषालीला खरी प्रसिद्धी मिळाली. मकरंद अनासपुरेची नायिका म्हणून वृषाली या चित्रपटात प्रमुख भूमिकेत दिसली. लग्नाची वरात लंडनच्या घरात, लादेन आला रे आला, आभरान, श्रीमान , इभ्रत, डिटेक्टिव्ह रागिनी अशा चित्रपटातून झळकल्यानंतर वृषाली दाक्षिणात्य आणि एका पंजाबी चित्रपटात सुद्धा महत्वाची भूमिका साकारताना दिसली. अभिनयाच्या जोडीलाच वृषाली सध्या इंटेरिअर डिझायनर तसेच बांधकाम व्यवसायात काम करत आहे. बांधकाम व्यावसायिक सूरज सोबत विवाहबद्ध झाल्यानंतर तिने नवऱ्याच्या व्यवसायाला हातभार लावला. आर्यन हा त्यांचा मुलगा १२ वर्षाचा आहे.

Vrushali Hatalkar marathi actress
Vrushali Hatalkar marathi actress

या व्यवसाय क्षेत्रात स्थिरस्थावर झाल्यानंतर तिने आपली अभिनयाची आवड सुद्धा जोपासलेली पाहायला मिळते. नवख्या कलाकारांनी ती अभिनयाचे प्रशिक्षण देत आहे. सोबतच वेगवेगळ्या इव्हेंटसाठीही तिला आमंत्रित केले जाते. सध्या वृषाली आपल्या कुटुंबासह नाशिकला वास्तव्यास आहे मात्र शिवाजी पार्क येथे घराचे काम पूर्ण झाल्यानंतर ती मुंबईला शिफ्ट होणार आहे. यामुळे काम करण्यासाठी पुरेसा वाव मिळेल असे वृषाली आणि तिच्या कुटुंबियांना वाटते. बऱ्याच प्रतीक्षेनंतर वृषाली पुन्हा एकदा बॉलिवूड चित्रपटातून अभिनय करताना दिसणार आहे. सुनील शेट्टी यांच्या ‘नन्हे आइन्स्टाइन’ या आगामी चित्रपटाचे काम सध्या सुरू आहे. या चित्रपटात वृषाली एका महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटामुळे वृषाली पुन्हा एकदा बॉलिवूड मध्ये चमकणार आहे. सातत्याने अभिनय क्षेत्रात राहून वृषालीने एक गुणी अभिनेत्री म्हणून स्वतःची ओळख बनवण्यात यश मिळवलं आहे. तिच्या या यशस्वी वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button