news

प्रथमेश लघाटे आणि मुग्धा वैशंपायन यांचा नुकताच झाला साखरपुडा… खास फोटोने वेधलं साऱ्यांचंच लक्ष

सारेगमप लिटिल चॅम्प्स फेम मुग्धा वैशंपायन आणि प्रथमेश लघाटे यांनी एकमेकांवर असलेल्या प्रेमाची कबुली दिल्यानंतर दोघेही लग्न कधी करणार असे त्यांच्या चाहत्यांना झाले होते. मात्र आता लवकरच त्यांची लग्नघटिका जवळ आलेली पाहायला मिळत आहे. गेल्या काही दिवसांपासून मुग्धा आणि प्रथमेशच्या केळवणाचा थाट त्यांच्या नातेवाईकांच्या घरी सजलेला पाहायला मिळाला होता. मुग्धा सोबत तीची बहीण मृदुला वैशंपायन हिच्याही लग्नाची जोरदार तयारी सुरू झालेली आहे त्यामुळे वैशंपायन कुटुंबात यंदा दोन लग्न कार्ये पार पडणार आहेत.

mugdha vaishampayan and prathmesh laghate
mugdha vaishampayan and prathmesh laghate

काल रविवारी ५ नोव्हेंबर रोजी मुग्धा आणि प्रथमेशच्या साखरपुड्याचा सोहळा पार पडला. अतिशय साधेपणाने आणि मोजक्या नातेवाईक मित्रमंडळींच्या समवेत त्यांचा हा साखरपुडा संपन्न झाला. ना कुठला जास्तीचा मेकअप , भरजरी साड्या आणि नाही कुठला गाजावाजा यामुळेच त्यांचा हा सोहळ्यातील साधेपणा चाहत्यांना विशेष भावला. साधी नारंगी लाल रंगाची साडी नेसलेली मुग्धा त्या पेहरावात सुद्धा खूपच सुंदर दिसत होती. तर प्रथमेशने देखील नेहमीप्रमाणेच एक लाल रंगाचा साधा कुर्ता परिधान केला होता. गावच्या कुशीत आणि निसर्गाच्या सानिध्यात त्यांचा हा साखरपुडा संपन्न झाला.या साखरपुड्या नंतर दोघेही लवकरच विवाहबंधनात अडकताना पाहायला मिळणार आहेत.

mugdha and prathmesh sakharpuda
mugdha and prathmesh sakharpuda

तूर्तास दोघेही सध्या दिवाळी पहाटच्या कार्यक्रमांमध्ये व्यस्त आहेत. मुग्धा आणि प्रथमेश दोघेही अतिशय समजूतदार आहेत. दोघांच्याही वयात चार ते पाच वर्षांचे अंतर आहे. लग्नाच्या बाबतीत मुग्धाचे स्पष्ट असे मत आहे की, आजकालच्या मुलामुलींमध्ये समजूतदारपणा खूप कमी आहे त्यामुळे नातं टिकवून ठेवण्यासाठी खूप संघर्ष करावा लागतो. मुलांकडून अवास्तव अपेक्षा ठेवल्या जातात. मुलीनेही सेटल असावे तरच मुलांकडून ती अपेक्षा ठेवावी असे मुग्धाचे स्पष्ट म्हणणे आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button