१ नोव्हेंबर रोजी देशभरात करवा चौथ हा व्रत साजरा करण्यात आला. मराठमोळी अभिनेत्री मानसी नाईक हिने सोशल मीडियावर अशाच आशयाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला. तेव्हा नेटकऱ्यांनी तिला नवऱ्याशीवाय करवा चौथ कसा साजरा करतेस? असा प्रश्न विचारत ट्रोल करण्यास सुरुवात केली. मीडिया माध्यमांनी देखील मानसी नाईक च्या या व्हिडिओवरून तिने करवा चौथ साजरा केला अशा स्वरूपाच्या बातम्या छापून आणल्या. या ट्रोलिंगवर आणि करवा चौथच्या व्हिडिओवर स्पष्टीकरण देताना मानसी नाईक म्हणते की, “हे तुम्हाला माहीत असावं म्हणून मी सांगते की मला माहित आहे की मी विभक्त होण्याच्या प्रक्रियेत आहे. याचा अर्थ असा नाही की ज्यात भावनिक आणि पारंपरिकतेला अनुसरून गोष्टी दाखवल्या जातात हा एका व्यवसायाचा भाग आहे आणि तो मी स्वीकारू नये!
मी एक कलाकार आहे आणि हो मी पारंपारिक मूल्यांचा आदर करते आणि त्याचे पालनही करते. मला हे सांगावं लागतंय की ‘मैं करावा चौथ का शूट कर रही थी’. आणि लग्नानंतरचा हा माझा पहिला करवा चौथ आहे जो मी एकट्याने मुंबईत साजरा केला दुसरीकडे कुठेही नाही. मला माहित आहे की कोणत्याही ‘नयी दुल्हनसाठी’ हे खूप वाईट वाटतं पण हे कटू सत्य आहे. माझ्या सर्व मीडिया मित्रांना विनंती आहे की कृपया सर्व मीडिया वाल्यांनी अशी चुकीची बातमी देऊ नये. मीडियाच्या माध्यमातून चुकीची माहिती देण्यात येत आहे. माझ्या वैयक्तिक आयुष्यातील एवढ्या खडतर प्रवासानंतरही मी काम करत आहे. माझे कुटुंब, प्रेक्षक आणि प्रसारमाध्यमांद्वारे मला भावनिकरित्या प्रेम आणि पाठिंबा दिल्याबद्दल मी खरोखर तुम्हा सर्वांची आभारी आणि कृतज्ञ राहीन .” मानसी नाईक हीने हरियाणाच्या परदीप खरेरा सोबत लग्न केले होते. पण काहीच वर्षात तिला त्याचे खरे रूप दिसून आले.
परदीपने केवळ पैशांसाठी आणि प्रसिद्धी मिळवण्यासाठीच आपल्यासोबत लग्न केले आल्याचे कळताच मानसीने त्याच्यापासून वेगळे होण्याचा निर्णय घेतला. घटस्फोटाची प्रक्रिया अजूनही सुरू आहे. पण करवा चौथच्या त्या व्हिडिओमुळे मानसी नाईक पुन्हा चर्चेत आली. हा व्हिडीओ केवळ एका व्यवसायाचा भाग असल्याचे यातून तिने स्पष्ट केले आहे. मानसीचा प्रेमावर अजूनही विश्वास आहे. लग्न करून घर संसारात रमायची तिची इच्छा आहे असे तिने भार्गवी चिरमुलेला दिलेल्या मुलाखतीत म्हटले होते.