पाकिस्तानचा हिंदू क्रिकेटर ज्याला इतका त्रास दिला कि देश सोडून … हिंदू असल्याने इतर खेळाडू सोबत जेवू देत नसत इतकंच काय तर
भारत आणि पाकिस्तान यांच्या क्रिकेट सामन्यात भारताने पाकिस्तानचा दारुण पराभव केला. भारतीय क्रिकेटर आणि पाकिस्तान क्रिकेटर ह्यांच्यातील मैत्रीचे किस्से तुम्ही अनेक वेळा ऐकले असतील. पण असा एक हिंदू पाकिस्तानी क्रिकेटर आहे ज्याला पाकिस्तान संघात समावेश तर केलं पण त्याला कधीच चांगली वागणूक दिली गेली नाही. त्या क्रिकेटरच नाव आहे “दानिश कनेरिया”. दानिश कनेरिया हा पाकिस्तानचा उत्तम फिरकी गोलंदाज म्हणून सर्व परिचित आहे. अनेक वर्ष तो पाकिस्तान संघात खेळला. पण अचानक परदेशात कायमस्वरूपी राहायला गेल्याने त्याला त्याच कारण विचारताच त्याला अक्षरशः रडू कोसळलं. हिंदू लोकांची पाकिस्तानात काय दुरावस्था आहे ह्याच हे उत्तम उदाहरण म्हणावं लागेल.
दानिश कनेरिया म्हणतो शाहिद आफ्रिदी कॅप्टन असताना माझ्यावर अनेकवेळा मुस्लिम धर्म स्वीकारण्यासाठी दबाव टाकला गेला. पण मी हिंदू धर्मात जन्मलो आहे आणि मला हिंदू म्हणूनच मारायचं आहे. माझ्या सोबत इतर कोणी खेळाडू बोलत नव्हते. इतकंच नाही तर मी ज्या टेबलवर जेवायला बसायचो तिथून सर्व क्रिकेटर दुसऱ्या टेबलवर जायचे. माझ्या सोबत त्यांना जेवण देखील करायचं नव्हतं. दरवेळी अपशब्द वापरून मला भांडण करायला भाग पडायचे जेणे करून माझीच चूक आहे असं त्यांना दाखवायचं होत. मी अनेक वेळा ह्याची कम्प्लेंट क्रिकेट बोर्डकडे केली पण मला तिथेही थारा दिला गेला नाही. मी सामना खेळण्यासाठी तयार असताना आणि सामन्याचा पिच माझ्यासाठी अनुकूल असताना देखील शाहिद आफ्रिदी दरवेळी मला बाजूला करत दुसऱ्यांना चान्स द्यायचा. पाकिस्तानमध्ये हिंदूंना काहीही स्थान नाही हे मला त्यावेळी कळून चुकलं होत. माझ्यासारख्या प्रसिद्ध व्यक्तीला अशी वागणूक मिळत असेल तर सामान्य हिंदू लोकांना काय काय सहन करावं लागेल असेल ह्याचा विचार करा.
दानिश कनेरिया पुढे असं देखील म्हणतो कि, सर्व टीमला त्यांचा पगार वेळेवर मिळायचा पण मला पगारासाठी दरवेळी विनवणी करावी लागायची. मी रिटायर झालो तेव्हाही अनेक मिडीयानी मला सल्लागार म्हणून नियुक्त केलं पण त्यांनी देखील मला पेमेंट दिल नाही. अत्यंत हिन दर्जाची वागणूक आणि पैश्यांची अडचण ह्यामुळे मी देश सोडायचा निर्णय घेतला. आज मी युट्यूब वरून जय श्रीराम म्हणून सुरवात करतो तेंव्हाही अनेक पाकिस्तानी लोक मला शिव्या देताना पाहायला मिळतात. मी कोणाचाही अपमान कधीच केला नाही पण माझ्या देवाचं नाव मी घेतलं तर त्यात काय गैर आहे. मी हिंदू आहे आणि मला त्याचा अभिमान आहे भारतीय संघात अनेक मुस्लिम खेळाडू आहेत पण त्यांना अशी घाणेरडी वागणूक कधीच दिली गेली नाही.