news

पैसे कुठून येतात ना कुठला चित्रपट ना कुठली मालिका? प्रश्नावर मितालीने खरपूस शब्दांत दिलं उत्तर म्हणते

अभिनेत्री मिताली मयेकर सध्या तिचा क्वालिटी टाइम परदेशात स्पेन्ड करत आहे. सध्या मिताली कुठल्याही प्रोजेक्टमध्ये काम करत नाहीये पण गेल्या काही दिवसांपासून ती परदेशात तीचा क्वालिटी टाइम एन्जॉय करताना दिसत आहे. सिद्धार्थ चांदेकर सोबत तिने एशिया ट्रिप केली होती. बीचवर काढलेल्या बिकिनी मधील फोटो मुळे ती ट्रोलर्सच्या निशाण्यावर आली होती. गेल्या वर्षी देखील मिताली अशाच फोटोंमुळे ट्रोल झाली होती. तर आताही तिला ट्रोलर्सकडून अशाच काही प्रतिक्रिया मिळू लागल्या आहेत. मितालीच्या नुकत्याच शेअर केलेल्या बिचवरच्या एका फोटोवर ‘नागडं झालं तर फिल्ममध्ये काम भेटतं का?’ असा प्रश्न विचारला आहे. या ट्रोलर्सना मितालीने खरपूस शब्दांत उत्तर देताना म्हटले आहे की, ” माहीत नाही बुवा! बघा प्रयत्न करून.” मितालीच्या या उत्तरावर तिच्या चाहत्यांनी देखील कमेंट करत ट्रोलर्सचा समाचार घेतला आहे.

mitali mayekar marathi actress
mitali mayekar marathi actress

मिताली गेल्या काही दिवसांपासून तिच्या ट्रिपचेच फोटो सोशल मीडियावर शेअर करत आहे तेव्हा एका युजरने तिला एक वेगळाच प्रश्न विचारला होता. “पैसे कुठून येतात…ना कुठला चित्रपट ना कुठली मालिका?” असा प्रश्न तिला विचारण्यात आला तेव्हा मिताली त्यावर प्रतिक्रिया देताना म्हणते की, ” झाड लावलंय… तुला हव्यात बिया”. त्यामुळे मिताली सध्या ट्रोलर्सच्या प्रश्नांना सडेतोड उत्तरं देताना पाहायला मिळत आहे. बिकिनीच्या मुद्द्यावरून अभिनेत्री तेजस्विनी पंडित हिनेही एक वक्तव्य केले होते की, बिकिनी बीचवर नाही घालणार तर कुठे घालणार?. कलाकारांना चर्चेत राहायचे असते तेव्हा ती अशी काही खरमरीत पोस्ट सोशल मीडियावर नेहमीच शेअर करत असतात. आपण आता ट्रोल होणार हे त्यांना ठाऊक असतेच अर्थात हे सर्व चर्चेत राहण्यासाठीचे एक निमित्त असते. पण यामुळे काम मिळते का? असा प्रश्न सर्वसामान्यांना पडला नाही तरच नवल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button