अभिनेत्रीचा धक्कादायक खुलासा आपण मिठी मारायला उठतो तेव्हा खाली टोचतं…मी त्याला एवढंच म्हणाले खबरदार मला इथून पुढे
तब्बल १० वर्ष मॉडेलिंग क्षेत्र गाजवलेल्या आणि मराठी मालिकेतून घराघरात पोहोचलेल्या दिशा परदेशी हिने मॉडेलिंग क्षेत्रातील धक्कादायक अनुभवाबद्दल एक खुलासा केका आहे . दिशा परदेशी ही अनेक नामांकित डिझाईनर्सकडे मॉडेलिंग, तसेच अनेक मोठ्या ब्रँड्ससाठी जाहिराती करते. त्याचप्रमाणे दिशा मिस महाराष्ट्र स्पर्धेची विजेतीही ठरली होती. ‘बुगी वुगी’, ‘एकापेक्षा एक’ या रिएलिटी शोमध्येही तिने सहभाग दर्शवला होता. दिशा स्वाभिमान या मालिकेत निहारीकाची भूमिका साकारताना दिसली होती. तर वैशाली सामंतच्या कन्याकुमारी गाण्यातून तिने लोकप्रियता मिळवली होती. दिशा परदेशी ही मूळची राजस्थानची राजपूत घराण्याची. पण राजस्थानमध्ये काहीच नसल्याने त्यांचे कुटुंबीय बरेच वर्ष धुळे जिल्ह्यात स्थायिक झाले. त्यामुळे दिशा स्वतःला महाराष्ट्रीयनच समजते. राजपूत सण ती साजरे करत नाही पण तिचे कुटुंब महाराष्ट्रातील सण साजरे करतात.
आजोबा, आई वडील सगळ्यांचे शिक्षण मराठीतूनच झालं त्यामुळे दिशालाही छान मराठी बोलता येतं. शाळेत असल्यापासूनच दिशाने कथ्थकचे धडे गिरवले आहेत. दहावीनंतर भरत अँड डॉलर्स या मेकअप आर्टिस्टकडे तिने मॉडेलिंग केले. जवळपास चार वर्षे ती मॉडेल म्हणून त्यांच्याकडे काम करत होती. त्यानंतर दिशाने रुईया कॉलेजमध्ये पुढील शिक्षणासाठी प्रवेश मिळवला. सोबतच तिचे मॉडेलिंग सुद्धा चालूच होते. दरम्यान फिल्फेअर, फेमिना मॅगझीनमध्ये कव्हर पेजवर तिचे फोटो छापून येत होते. त्यामुळे दिशाने अल्पावधीतच मॉडेलिंग क्षेत्रात जम बसवला होता. खरं तर या क्षेत्रात आल्यानंतर दिशाला जवळच्याच लोकांनी नावं ठेवली. मॉडेलिंग करते असे म्हटल्यावर लोक तिला त्या दृष्टिकोनातूनच पाहू लागले. सुरुवातीच्या काळात दिशा शरीराने खूपच बारीक होती. काठीला साडी गुंडाळावी एवढी ती बारीक दिसत होती. यावरून दिशाला ट्रोलही करण्यात आले. मित्र मैत्रिणी, नातेवाईक , सहकलाकार तिला फुक मारली की उडून जाशील, पतंग आहेस तू असे म्हणून चिडवू लागले. पण मॉडेलिंग क्षेत्रात शरीराने बारीक असलेलीच मॉडेल हवी असल्याने तिथे तिला ट्रोल केले जात नव्हते. दिशा या बोडिशेमिंगवर म्हणते की, ‘ज्याला त्याला जसं राहायचंय तसं राहुद्या.’
दिशाला मॉडेलिंग क्षेत्रात अनेक वाईट अनुभव सुद्धा मिळालेत. या अनुभवाबद्दल ती म्हणते की, ‘एखादा इव्हेंट झाल्यानंतर समोरच्या व्यक्तीला निरोप देताना शेक हॅन्ड केला जातो किंवा बाय करतो आणि उठून हग केलं जातं तेव्हा खाली टोचतं हे माझ्यासोबत एकदा दोनदा नाही तर अनेकदा झालं आहे. म्हणजे फक्त समोर उभं असल्यानेच एखाद्या पुरुषाला एवढा फरक पडतो ही माझ्यासाठी समजण्यापलीकडची गोष्ट आहे. मी मॉडेल असताना ह्या गोष्टी अनेकदा झाल्या आहेत. काही दिवसांपूर्वीच मी एक शूट करत होते. एका स्टायलिस्टच्या असिस्टंटने मला चुकीच्या पद्धतीने हाताळण्याचा प्रयत्न केला. तिसऱ्यांदा जेव्हा त्याचा हात पुढे आला तेव्हा मी तो हात झटकला.मी त्याला कानाखाली मारायला हात वर केला पण त्या क्षणीच मी स्वतःला कंट्रोल केलं. कधीकधी या गोष्टी इग्नोर कराव्या लागतात कारण त्यानंतर जर मी आवाज उठवला असता तर तमाशा झाला असता मग माझं दोन तास शूटिंग रखडलं असतं. त्यापेक्षा मला असं वाटतं की आपलं काम आपण गुपचूप करून निघावं. मी त्याला एवढंच म्हणाले की, खबरदार मला इथून पुढे हात लावलास तर आणि यापुढे कधीच माझ्या समोर येऊ नकोस. असं म्हणून मी त्याला बाजूला केलं आणि पुढच्या गोष्टी मी स्वतः केल्या.’ कधी कधी अशा गोष्टी तुम्हाला जाणूनबुजून इग्नोर कराव्या लागतात असे ती म्हणते पण यामुळे आपण कुठेतरी कमजोर आहोत असा त्याचा मुळीच अर्थ होत नाही.