आधी बीफ हवं मग बिर्याणी आणि आता आमचे प्रेक्षकच नसल्याने आज हरलो… पाकिस्तानी जनतेची आणखीन एक मागणी
क्रिकेट विश्वचषक स्पर्धा २०२३ भारतात होत असून आज भारत आणि पाकिस्तान ह्या २ संघात सामना झाला. भारताने टॉस जिंकून प्रथम पाकिस्तानला बॅटिंगसाठी आमंत्रित केले. पाकिस्तानने सुरवात चांगली केली पण नंतर एकामागून एक गाडी बाद झाल्याने अवघ्या ४२ ओव्हरमध्ये सर्व बाद १९१ धाव केल्या. १९२ धावांचा पाठलाग करताना ३ गाडी बाद ३०.३ ओव्हरमध्ये हा सामना जिकल. भारताकडून रोहित शर्माने सर्वाधिक ८३ धावा केल्या.रोहितच्या साथीला श्रेयस अय्यरने ५३ धावांची खेळी केली. विशेष म्हणजे पाकिस्तान संघाकडून ह्या सामन्यांमध्ये कोणाही खेळाडूला १ हि षटकार (६) मारता आला नाही. तर भारताच्या रोहित शर्माने उत्तम खेळी करत एकट्यानेच ६ षटकार मारले. आजच्या सामन्यामुळे पाकिस्तानी जनतेची चांगलीच हिरमोड झाली आहे. श्रीलंकेच्या टीमसोबत मोठी धावसंख्या चेस करणारी टीम आज इतकी वाईट कशी खेळली ह्याची आता जोरदार चर्चा सुरु आहे.
आजच्या सामन्यात पाकिस्तानी संघाला सपोर्टर्स मिळाले नाही. आमचे प्लेयर्स चांगले खेळ खेळात असूनही त्यांना फक्त सपोर्टर्स आणि चेअर करणाऱ्या प्रेक्षकांची कमी भासल्याने हा सामना पाकिस्तान हरला हि वस्तुस्तिथी असल्याचं तेथील क्रिकेट तज्ज्ञांचं देखील मत आता व्यक्त होताना पाहायला मिळत आहे. ग्राऊंवर तब्बल १ लाखांहून अधिक प्रेक्षक होते आणि ते सर्व भारतीय संघाच्या बाजूने होते त्यात पाकिस्तानी लोक शोधूनही सापडत नव्हते ह्यामुळेच पाकिस्तान चांगला खेळ करू शकला नाही असं मत व्यक्त होताना पाहायला मिळत आहे. सुरक्षेच्या खातर आणि काही वर्षांपासून भारत पाकिस्तान संबंध चांगले नसल्याने पाकिस्तानी जनतेला भारत व्हिजा देत नाही.
त्यामुळेच पाकिस्तानी जनता आपल्या खेळाडूंना समर्थन द्यायला भारतात येऊ शकत नसल्याने आम्ही आजचा समना हरलो असं मत व्यक्त होताना पाहायला मिळत आहे. भारतात पाकिस्तान टीम आल्यापासून सुवातील बीफ खायला हवं त्यानंतर बिर्याणी हवी आणि आता आमच्या जनतेला भारतात येऊ द्यावं अशी मागणी होताना पाहायला मिळत आहे. पण पाकिस्तानी जनता सध्यातरी भारतात येणं हि अश्यक्य गोष्ट आहे. ह्यापूर्वी देखील तब्बल ७ वेळा विश्वचषक स्पर्धेत भारताने पाकिस्तानला हरवलं आहे. दरवेळी काही ना काही कमी काढत आणि सतत मागण्या करायची पाकिस्तानी जनतेला सवयच झालेली असल्याचं पाहायला मिळत आहे.