news

सई ताम्हणकरच मुंबईतील आलिशान घर पाहिलंय… एवढ्या वर्षात पहिलं हक्काचं घर खरेदी केल्याने होतोय शुभेच्छांचा वर्षाव

घर असावं घरासारखे नकोत नुसत्या भिंती या कवितेच्या ओळी आठवल्या की आपलंही एखादं छोटंसं घर असावं पण ते घर नुसतं घरासारखं चार भिंतींचं नसून त्यात आपुलकीने राहायला आवडेल असं असायला हवं हे प्रकर्षाने वाटतं. सई ताम्हणकरचे सुद्धा हेच म्हणणे आहे की, घर नुसतं घर नसावं त्यात तुम्हाला राहायला आवडायला हवं आणि म्हणूनच सई ताम्हणकर हिने नुकतंच हक्काचं घर खरेदी करून तिच्या घरात प्रवेश केला आहे. ‘द इलेव्हनथ प्लेस’ असे म्हणत सईने तिच्या या नवीन घराची झलक सोशल मीडियावर शेअर केली आहे. आतापर्यंत सईने दहा घरं बदलली आहेत पण हे अकरावं घर तिच्या हक्काचं झालं आहे. सई लहान होती तेव्हा ती सांगलीतील आईबाबांच्या घरात राहत होती. पुढे ती मुंबईला येऊन मावशीकडे राहायला लागली.

sai tamhankar home in mumbai
sai tamhankar home in mumbai

काही दिवस तिने पेइंग गेस्ट म्हणूनही काढले होते. त्यानंतर ती आता जिथे राहते त्या बिल्डिंगच्या समोरच्याच बिल्डिंगमध्ये ती एका फ्लॅटमध्ये राहत होती. पण आता आपलंही घर असावं या हेतूने सईने मुंबईत स्वतःच्या हक्काचा फ्लॅट खरेदी केला आहे. आपला फ्लॅट आलिशान नसला तरी या घरात मन माझं रमतं असे तो सांगते. खिडकीत बसून सकाळच्या कॉफीचा आस्वाद घेत दिवसाची ती सुरुवात करते. सकाळचा हा एक तास मी स्वतःसाठी काढते त्यामुळे कामाची सुरूवात चांगली होते असे ती सांगते. सई आपल्या या नवीन घराबद्दल सांगते की, “या घरात किती लोक मावतील हे मी नाही सांगू शकत कारण या घरात ३० ,४० माणसं येऊन राहिली आहेत. ती सेटल झाली आहेत हे माझ्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. आपल्या हातात सर्व गोष्टी याव्यात असं वाटतं पण मी सध्या या घरात एकटीच राहते त्यामुळे स्वतःसाठी नाश्ता आणि जेवण बनवणं या गोष्टी मलाच कराव्या लागतात.”

sai tamhanjar new home
sai tamhanjar new home

सईचं मुंबईतील हे घर एकदम प्रशस्त आहे, पांढऱ्या रंगाच्या थीमला तिने विशेष प्राधान्य दिलेले पाहायला मिळते त्यामुळे भरपूर उजेड आणि प्रसन्न वाटावं असं या घराचं इंटेरिअर तिने करून घेतलं आहे. साई ताम्हणकर ही गेली अनेक वर्ष मराठी इंडस्ट्रीत कार्यरत आहे. गेल्या काही वर्षांपासून सई बॉलिवूड इंडस्ट्रीतही स्वतःच्या नावाचा ठसा उमटवत आहे. एवढ्या वर्षात तिने हक्काचं घर खरेदी केलं नाही पण सईला आलिशान गाड्या खरेदी करण्याचा छंद आहे. नवीन गाडी खरेदी केल्यानंतर काहीच वर्षात सई पुन्हा नवीन ब्रँडची गाडी खरेदी करत असते. याबाबत स्वप्नील जोशीने तिची कित्येकदा कानउघडणी केली आहे. ‘पण ती सई आहे, मी तिला असे सांगितल्यावर ती फक्त हसते आणि तिला जे हवं तेच ती करते’ असे स्वप्नील तिच्याबाबत सांगत असतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button