मी जिथे कार्यक्रम करत होते तिथे त्या मुलाने मला लग्नाची मागणी घातली पण… मी अश्याच मुलाशी लग्न करेन जो
गौतमी पाटील गेल्या काही दिवसांपासून पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. लवकरच तिची प्रमुख भूमिका असलेला’ घुंगरू’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. हा चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षकांनी चित्रपटगृहात गर्दी करावी असे तिने तिच्या चाहत्यांना आवाहन केले होते. गौतमी पाटील हिने नुकतीच मीडियाला एक मुलाखत दिली आहे. वडिलांच्या निधनावरही तिने शोक व्यक्त केला आहे. वडिलांची वागणूक कशी होती याचाही तिने खुलासा केला होता पण आता त्यांच्याबद्दल बोलण्यासाठी ही योग्य वेळ नाही आणि मी त्यांना बोलण्याएवढी मोठी नाही असे ती या मुलाखतीत सांगते. काही महिन्यांपूर्वी गौतमी पाटीलचा कपडे बदलतानाचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. हा व्हिडीओ पाहून तिला खूप मोठा धक्का बसला होता. आता आपल्या आयुष्यातलं सगळं काही संपलंय, आपण इथेच थांबायला हवं, असं तिला वाटू लागलं होतं.
याबद्दल गौतमी म्हणते की, “मी घरी होते तेव्हा हा व्हिडीओ पाहून मला खूप मोठा धक्का बसला होता. आता सगळं काही संपलं आता आपण इथेच थांबायला हवं असा विचार मनात येऊ लागला, पण चाहत्यांनी आणि विशेष करून महिलांनी मला पाठिंबा दिला. त्यांच्या पाठिंब्यामुळे मी पुन्हा खंबीर झाले. लोकांनी मला सांभाळुन घेतलं त्यांचे मी आभार मानते”. गौतमी पुढे असेही म्हणते की,” मी खूप गरीब घराण्यातली मुलगी आहे. माझ्या मागे कुठलाही हात नाही ,मला कोणाचाही पाठिंबा नाही त्यामुळे माझ्यावर सतत टीका होत असते. ज्यावेळी माझ्याकडून चूक झाली तेव्हा मी सगळ्यांची माफी देखील मागितली होती पण आता मी सगळं सुरळीत करते तरीही लोक टीका करत आहेत. जे टीका करतात ते मोठे लोक आहेत , मला हे राजकारण अजिबात कळत नाही. आयोजक जसे सांगतील तसे मी करत असते.
माझ्यासारखे कलाकार खूप पुढे गेले त्यांना चित्रपटातून काम करण्याची संधी मिळाली. त्यांना अशा टीकेला कधीच सामोरे जावे लागले नाही. आपण पुढे चाललो म्हणून लोक टीका करत आहेत असे मला वाटते. म्हणून सतत वाटत राहतं की आपल्या मागे कोणाचाच पाठिंबा नाही, आणि कोणाचा हात देखील नाही.” गौतमीला काही दिवसांपूर्वीच लग्नाची मागणी आली होती. “मी जिथे कार्यक्रम करत होते तिथे तो मुलगा आला आणि त्याने माझ्या मॅनेजरशी बोलताना मला लग्नाची मागणी घातली होती. मला अनेकजण लग्नासाठी विचारतात. मी अजून तरी लग्नाचा विचार केलेला नाही, पण माझ्यासोबत जे काही झालंय ते स्वीकारणाऱ्या मुलाशीच मी लग्न करेन “असे गौतमी म्हणते.