तरुण वयात खूपच सुंदर दिसत होत्या रविंद्र महाजनी यांच्या पत्नी…सगळं सुरळीत असताना अभिनय सोडून त्यांनी
रविंद्र महाजनी यांच्या निधनानंतर त्यांच्याबद्दल आणि मुलगा गश्मीर बद्दल बरंच काही बोलण्यात आलं. दोघांनाही मीडिया माध्यमातून जाणून घेता आलं मात्र आज रविंद्र महाजनी यांच्या पत्नी माधवी महाजनी यांच्याबद्दल माहीत नसलेल्या काही खास गोष्टी आपण जाणून घेऊयात. रविंद्र महाजनी यांचे वडील ह रा महाजनी हे पत्रकार होते. पुढे त्यांनी प्रसिद्ध वृत्तपत्रासाठी संपादक पदी काम केले याचदरम्यान त्यांचे निधन झाले. त्यामुळे रविंद्र महाजनी पोटापाण्यासाठी मुंबईत टॅक्सी चालवत होते. अभिनयाची आवड असल्याने रविंद्र महाजनी नाटकातून काम करत असत. हा स्ट्रगल सुरू असताना झुंज या चित्रपटाने त्यांना मोठी प्रसिद्धी मिळवून दिली. याचदरम्यान रविंद्र महाजनी माधवीच्या प्रेमात पडले. त्या तरुण वयात माधवी अतिशय देखण्या दिसत होत्या.
कालांतराने त्यांनी एकमेकांसोबत लग्न केले. रविंद्र महाजनी पत्नीला मधु अशी हाक मारत असत. रविंद्र महाजनी मराठी सृष्टीत प्रसिद्धीच्या झोतात आले. नायक म्हणून त्यांनी मराठी सृष्टीचा एक काळ गाजवला. अशातच रश्मीचा जन्म झाला. रश्मीच्या जन्मानंतर १३ वर्षाने त्यांना दुसरे अपत्य झाले. या काळात रविंद्र महाजनी मुख्य भूमिका सोडून चरित्र अभिनेत्याच्या भूमिका साकारू लागले. सर्व काही सुरळीत चालू असतानाच मित्राच्या मदतीने ते चित्रपट निर्मिती क्षेत्रात आणि रिअल इस्टेट क्षेत्रात उतरले. पण यात त्यांना मोठे नुकसान सोसावे लागले. पुण्यातील राहते घर बँकेने जप्त केले. अशातच गश्मीरने या कर्जाचे ओझे आपल्या खांद्यावर पेलले. याचदरम्यान रविंद्र महाजनी कुटुंबापासून वेगळे राहू लागले. डान्सचे क्लासेस घेण्यापासून ते इव्हेंट मॅनेजमेंट करून गश्मीरने त्यांचे सर्व कर्ज फेडले. याचदरम्यान माधवी गश्मीरच्या डान्स क्लासेसमध्ये अकाउंटचे काम सांभाळत होत्या. प्रवीण तरडे एकांकिका करत तेव्हा गश्मीरच्या डान्स क्लासमध्ये ते भेट देत असत. याचवेळी गश्मीरबाबतची काळजी माधवी यांनी प्रविणकडे बोलून दाखवली होती. पुढे अभिनयाची उत्सुकता गश्मीरला मुंबईत घेऊन आली तेव्हा मधु यांनी गश्मीरला जेवण बनवण्यास शिकवले.
स्ट्रगलच्या काळात गश्मीर स्वतःच्या हाताने स्वयंपाक बनवू लागला. दरम्यान बहिणीचे लग्न झाले. पुढे तो आईला घेऊन मुंबईत दाखल झाला. यादरम्यान माधवी यांचे स्वास्थ्य बिघडू लागले. मरणाच्या दारातून परत यावे अशी त्यांची अवस्था झाली होती. गश्मीर आपल्या आईला अम्मी म्हणून हाक मारतो. या कठीण काळात त्याने आईला मोठा धीर दिला होता. रविंद्र महाजनी सोबत त्यांनी प्रेमविवाह जरी केला असला तरी हे प्रेम एकतर्फी टिकून होते, आईनेच तिच्या परीने हे नाते निभावले होते असे तो एका मुलाखतीत म्हणाला. नवऱ्याचा दुरावा, आर्थिक संकट आणि सततचा मानसिक ताण यामुळे माधवी यांना वेगवेगळ्या व्याधी जडल्या. पतीच्या निधनानंतर तर त्यांची प्रकृती अजूनच खालावली होती अशातच त्या चालता चालता घरात कोसळल्या होत्या. त्यावेळी गश्मीरने आईला रुग्णालयात दाखल केले होते. रविंद्र महाजनी जेव्हा कधी कुटुंबासोबत राहिले तो काळ आईसाठी मोठ्या आनंदाचा ठरला असे तो नेहमी सांगतो.