news

जेनेलिया ३ ऱ्या अपत्याच्या प्रतीक्षेत…मिडियासमोर बेबी बंप लपवताना झाली स्पॉट

महाराष्ट्राची लाडकी जोडी म्हणून रितेश देशमुख आणि जेनेलिया देशमुख यांच्याकडे पाहिले जाते. मीडियामध्ये तर रितेशला दादा तर जेनेलियाला वहिनी म्हणून अनेकदा हाक मारताना पाहिले गेले आहे. वेड या चित्रपटातून दोघांच्या जुळून आलेल्या केमिस्ट्रीवर प्रेक्षकांनी भरभरून प्रेम केले. त्याचमुळे वेड हा चित्रपट एक यशस्वी मराठी चित्रपट म्हणून गणला गेला. या चित्रपटाच्या निमित्ताने दोघांनाही खूप जवळून अनुभवता आले. त्यांच्या आवडीनिवडी, रोजचे रुटीन आणि मुलांवर केलेले संस्कार यामुळे या जोडीला सेलिब्रिटी विश्वात आदर्शस्थानी मानले गेले. नुकतेच या दोघांना मुंबईत एका इव्हेंटमध्ये पाहिले गेले. जेनेलिया मिडियासमोर स्पॉट होताच अनेकांना ती प्रेग्नंट असल्याचे जाणवले. त्यावरून रितेश आणि जेनेलिया त्यांच्या तिसऱ्या अपत्याच्या प्रतीक्षेत असल्याचे बोलले जात आहे. नुकत्याच पार पडलेल्या Aashni and co या फॅशन ब्रँडच्या इव्हेंटमध्ये या दोघांना आमंत्रित करण्यात आले होते.

genelia baby bump
genelia baby bump

त्यावेळी जेनेलियाने निळ्या रंगाचा ड्रेस परिधान केला होता. या निळ्या रंगाच्या ड्रेसमध्ये जेनेलिया अतिशय खुलून दिसत होती. अशातच मिडियासमोर पोज देताना ती पोटावर हात ठेवून होती. तेव्हा प्रेक्षकांच्या लक्षात आले की ती बेबी बंप लपवत आहे. यावरून जेनेलिया प्रेग्नंट आहे अशी एकच चर्चा रंगलेली पाहायला मिळाली. हे पाहून आता जेनेलिया आणि रितेश वर प्रेक्षकांनी अभिनंदनाचा वर्षाव करण्यास सुरुवात केली आहे. जेनेलिया तिसऱ्यांदा प्रेग्नंट झाली हे पाहून तिच्या चाहत्यांनी तिला शुभेच्छा देण्यास सुरुवात केली आहे. पण जेनेलिया खरंच प्रेग्नंट आहे का? असा प्रश्नही उपस्थित केला जात आहे. मिडियासमोर पोज देताना जेनेलिया प्रेग्नंट असल्याचे जाणवते. तिच्या चेहऱ्यावरदेखील मातृत्वाचं तेज पाहायला मिळालं. मात्र या प्रश्नाचे उत्तर चाहत्यांना येत्या काही दिवसातच उलगडेल. रितेश आणि जेनेलिया यांचा विवाह २०१२ मध्ये झाला होता. २०१४ साली त्यांना पहिले अपत्य झाले. २०१६ साली त्यांनी दुसऱ्या अपत्याला जन्म दिला. रियान आणि राहील हे जेव्हा कधी मिडियासमोर येतात तेव्हा ते अतिशय नम्रपणे हात जोडून उभे असतात. त्यांच्यावर झालेले हे संस्कार पाहून रितेश आणि जेनेलियाचे नेहमी कौतुक केले जाते. अशातच आता त्यांच्या तिसऱ्या अपत्याच्या आगमनाची चाहूल लागताच त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होताना दिसत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button