मिलिंद गुणाजी यांच्या मुलाच्या चित्रपट मुहूर्ताला अमित ठाकरेची हजेरी… चित्रपटाचं नाव आहे खूपच खास
मिलिंद गुणाजी आणि राणी गुणाजी या कलाकार दाम्पत्याचा लेक अभिषेक गुणाजी प्रथमच चित्रपट दिग्दर्शन क्षेत्रात उतरला आहे. “रावण कॉलिंग” हा त्याचा दिग्दर्शन असलेला पहिला मराठी चित्रपट असणार आहे. त्याअगोदर अभिषेकने व्यावसायिक जाहिराती तसेच लघुपटासाठी दिग्दर्शक म्हणून काम केले होते. आज रावण कॉलिंग या त्याच्या आगामी चित्रपटाचा शुटिंगचा मुहूर्त सोहळा पार पडला. या चित्रपटात पूजा सावंत, सचित पाटील, गौरव घाटणेकर आणि वंदना गुप्ते महत्वपूर्ण भूमिकेत झळकणार आहेत. चित्रपटाच्या महूर्तावेळी अमित ठाकरे यांनी हजेरी लावली होती. सोबतच मिलिंद गुणाजी आणि राणी गुणाजी यांनीही मुहूर्त सोहळ्याला हजेरी लावली होती.
अमित ठाकरे आणि अभिषेक गुणाजी हे दोघेही एकमेकांचे खूप चांगले मित्र आहेत. या दोघांनी एकाच कॉलेजमध्ये शिक्षण घेतले होते. एवढेच नाही तर दोघांनीही कॉलेजच्या मैत्रिणींसोबतच लग्नगाठ देखील बांधलेली पाहायला मिळाली. आपला खास मित्र चित्रपट दिग्दर्शन क्षेत्रात उतरतोय हे पाहून अमितने स्वतः हजेरी लावत या चित्रपटाचा मुहूर्ताचा पहिला क्लॅप देऊन शुभारंभ करून दिला. अभिषेक सोबत संकेत बंकेश्वर हा देखील या चित्रपटाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळणार आहे. श्री गजानन प्रोडक्शन निर्मित रावण कॉलिंग या नावातच बरंच काही दडलेलं आहे. त्यामुळे चित्रपटात तुम्हाला प्रेमाचा त्रिकोण पाहायला मिळणार असल्याचे बोलले जात आहे. सचित पाटील ,पूजा सावंत आणि गौरव घाटणेकर हे कलाकार या चित्रपटात मुख्य भूमिकेत पाहायला मिळणार आहेत.
तसेच सोनाली कुलकर्णी आणि वंदना गुप्ते सहाय्यक भूमिकेत दिसणार आहेत. अभिषेक गुणाजी या चित्रपटाच्या माध्यमातून दिग्दर्शन क्षेत्रात पाऊल टाकत आहे. छल आणि अंतःकरण अशा शॉर्टफिल्मचे दिग्दर्शन अभिषेकने केले होते. या दोन्ही शॉर्टफिल्ममध्ये मराठी कलाकार झळकले होते. अभिषेकला कॉलेजमध्ये असताना फोटोग्राफीची विशेष आवड होती. पण कालांतराने त्याचा दिग्दर्शन क्षेत्रातील ओढा पाहून सुरुवातीला जाहिरातींसाठी दिग्दर्शक म्हणून काम केले. आता याच क्षेत्रात एक पाऊल पुढे टाकत तो चित्रपटाच्या दिग्दर्शनाकडे वळला आहे. या पहिल्या वहिल्या चित्रपट दिग्दर्शनानिमित्त अभिषेक गुणाजीला शुभेच्छा.