news

ही तर कचरेवाली धुणीभांडी करणारीच वाटते आणि कामवालीचे …मी सोशल मीडियावर माझी मतं मांडायला लागले तेंव्हापासून

आपण प्रत्यक्षात कसे दिसतो आणि चित्रपटात कसे दिसतो यापेक्षाही आपला अभिनय महत्वाचा ठरतो. चित्रपटातील एक ठराविक भूमिकेसाठी प्रत्येकाला तशा पद्धतीचा मेकअप केला जातो. पण त्याही पलीकडे जाऊन त्या कलाकाराचा अभिनय पाहिला जावा हे मत हेमांगी कवी हिने मांडले आहे. वैयक्तिक आयुष्यात आपल्याला केवळ धुणी भांडी करणारी अभिनेत्री म्हणून ट्रोल केले गेले. ही कुठल्या अँगलने अभिनेत्री वाटते अशी टीका करण्यात आली मात्र सततच्या टीका पाहून या गोष्टींकडे हेमांगीने कानाडोळा केला. पण हे सत्य ही आपण आता स्वीकारलं आहे त्यामुळे अशा गोष्टींचे तिला आता वाईट वाटत नाही. नुकताच तिने रजनीकांतचा ‘जेलर’ चित्रपट पाहिला.

rajnikant film jailer and hemangi kavi
rajnikant film jailer and hemangi kavi

रजनीकांतचा आताचा लूक आणि चित्रपटातला लूक यात बरीच तफावत आहे पण म्हणून आपण त्यांना आहे तसे स्वीकारतोच ना. त्यांच्या अभिनयाची कस इथे महत्वाची मानली जाते. मग तुम्ही कसेही दिसा तुमचा अभिनय पाहिला जावा असे हेमांगी परखड शब्दांत म्हणते. या पोस्टमध्ये तिने ट्रोलर्सना कानपिचक्या सुद्धा दिल्या आहेत. ती म्हणते की, Looks च्या बाबतीत आपला आदर्श ठरलाय! Boss! Mind it! ‘Rajinikantha’ Film, Screen व्यतिरिक्त ही व्यक्ती without make up आणि wig बिनदिक्कत कुठेही फिरते. ही मुभा female actors ला नाही आणि समजा माझ्यासारखीने ती घ्यायची ठरवली मग ते screen असो वा वैयक्तिक आयुष्य तर तिला social media वर “ही तर कचरेवाली, धुणी भांडी करणारीच वाटते! कामवालीचेच role करते, ही कुठल्या angle ने heroine अभिनेत्री वाटते, आता म्हातारी दिसायला लागली वगैरे वगैरे सुरू होतं. (मी social var माझी मतं, posts लिहायच्या आधीपासून सुरू झालेलं आहे) सुरवासुरवातीला या comments ने वाईट वाटायचं, मग ह्या male -female actors च्या बाबतीतल्या फरकाबद्दल राग येऊ लागला पण आता दिसण्यातल्या खरेपणाला ज्यादिवसापासून आपलं केलं ना त्या दिवसापासून कशाचंच काही वाटत नाही!

actress hemangi kavi shumal
actress hemangi kavi shumal

आपण make up केला तर सौंदर्याच्या मोजपट्टीत आपण छान, आकर्षक वगैरे दिसतो आणि नाही केला तरी ‘जसे आहोत तसे best च आहोत’ हे feeling असतं! हा freedom मी माझ्यापुरता तरी मिळवलाय! खरंच! Make up करणं हा माझ्या कामाचा भाग आहे, तो केल्याने मी सुंदर, छान, आकर्षक दिसण्यापेक्षाही मी निभावत असलेलं character दिसणं जास्त गरजेचं असतं! Make up केल्याने कायापालट होतो. अभिनयात तेच महत्त्वाचं असतं! नाही का? पण काही लोकांना हे कळतंच नाही. द्वेषापोटी काही ही बोलत सुटतात! असो! आज काय त्यांचा वाढदिवस वगैरे नाहीए. काल Jailer पाहीला आणि जाणवत राहीलं. हा माणूस प्रत्यक्षात किती वेगळा पण तोच पडद्यावर आल्यावर किती वेगळा! Thanks to Super Duper Star Rajnikanth! You are an example & an inspiration to many of us in many ways…

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button