झी मराठीवरील यशोदा गोष्ट श्यामच्या आईची या मालिकेने काही दिवसांपूर्वीच प्रेक्षकांचा निरोप घेतला. मात्र तरीही या मालिकेतील पात्र प्रेक्षकांच्या विशेष स्मरणात राहिली आहे. छोट्या यशोदाचे बाबा म्हणजेच नारायन परचुरे ही भूमिका अभिनेते विशाख म्हामणकर यांनी निभावली होती. विशाख म्हामणकर यांना मुक्ती ह कन्यारत्न प्राप्ती झाली आहे. हे पाहून सेलिब्रिटींनी त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव करण्यास सुरुवात केली आहे. अक्षया गुजर सोबत विशाख म्हामणकर यांनी संसार थाटला होता. काही दिवसांपूर्वी अक्षयाचे डोहाळजेवण पार पडले होते. त्यांना आता कन्यारत्न प्राप्ती झाल्याने कुटुंबात आनंदाचे वातावरण आहे.
विशाख म्हामणकर हे गेली अनेक वर्षे मराठी सृष्टीशी जोडलेले आहेत. त्यांचे वडील विलास म्हामणकर हे देखील अभिनेते आहेत. मेकॅनिकल इंजिनिअरिंगची पदवी मिळवलेल्या विशाखला शालेय जीवनापासूनच अभिनयाची ओढ होती. कॉलेजमध्ये असल्यापासूनच हौशी नाटक, एकांकिका, राज्य नाट्य स्पर्धा यातून ते महत्वपूर्ण भूमिकेत दिसले. त्यांच्या अभिनयाला पुरस्काराने गौरविण्यात देखील आले. नाटकाचे लेखन तसेच दिग्दर्शनही त्यांनी केले होते. नाटकातून सुरू झालेला अभिनय क्षेत्रातला प्रवास त्यांना मालिका, चित्रपटात घेऊन आला. निद्राय, गूढगर्भ, स्वराज्य जननी जिजामाता, कथा एक कंस की अशा मालिका चित्रपटात विशाख यांना छोट्या मोठ्या भूमिका मिळत गेल्या.
यशोदा मालिकेमुळे विशाख यांना मोठी प्रसिद्धी मिळवून दिली. नानाच्या भूमिकेतून ते प्रेक्षकांच्या घराघरात पोहोचले. वडिलांच्या पावलावर पाऊल टाकत विशाख यांनीही अभिनय क्षेत्रात आता जम बसवलेला आहे. अशातच आता घरात लक्ष्मीच्या पावलाने आलेल्या त्यांच्या लेकीमुळे कुटुंबात आनंदाचे वातावरण आहे. विशाख आणि अक्षया म्हामणकर या दोघांनाही कन्यारत्न प्राप्तीच्या खूप खूप शुभेच्छा…