news

“म्हणून मी त्यांना पप्पा म्हणते”…सायली संजीवने प्रथमच सांगितला अशोक मामांना पप्पा म्हणण्याचे कारण

अभिनेत्री सायली संजीव ही सध्या झिम्मा २ या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. विविध मीडियामाध्यमातून ती या चित्रपटाचे प्रमोशन करताना दिसते. सायली सजीव ही काहे दिया परदेस या मालिकेमुळे महाराष्ट्राच्या घराघरात पोहोचली होती. या मालिकेमुळेच अशोक सराफ सायलीला लेक मानू लागले होते. सायली संजीव अशोक मामांना पप्पा म्हणते हे अनेकांना माहीत आहे पण हे नातं नेमकं कसं जुळलं याचा खुलासा तिने स्वतःच एका मुलाखतीत केला आहे. सायली संजीव अशोक सराफ यांना पप्पा का म्हणते याचे कारण सांगताना सायली म्हणते की, ” मी माझ्या वडिलांना बाबा म्हणते त्यामुळे अशोक सराफ यांनी मला पप्पा म्हणण्यास सांगितले. खरं तर अशोक सराफ हे खूप दिग्गज कलाकार आहेत. त्यांनी मला काहे दिया परदेस मालिकेपासून पाहिले होते. माझी त्यांच्याशी अगोदर कुठलीच ओळख नव्हती. त्यांनी माझी काहे दिया परदेस ही सिरीयल पाहिली होती.

sayali sajeev father and mother
sayali sanjeev father and mother

या मालिकेचा पहिला प्रोमो जेव्हा आला होता तेव्हा सगळ्यांनी कमेंट केल्या होत्या ही निवेदिता सराफ यांची कॉपी आहे. सगळीकडे असं झालं होतं की मी त्यांची मुलगी आहे. पण माझा त्यांच्याशी कुठलाच संपर्क नव्हता. अशोक सराफ त्यांचे शूटिंग चालू असेल तेव्हा ते ८.३० वाजता न चुकता पॅक अप करायचे आणि ९ वाजता माझी सिरीयल पहायचे. तोपर्यंत आमची अशी कधी कुठे भेट झाली नव्हती. पण अशोक सराफ यांच्या एका चित्रपटाच्या म्युजिक लॉन्च सोहळ्यात माझी भेट घडून आली. मी तिथे आलीये हे अशोक सराफ यांना कळले तेव्हा त्यांनी एका मित्राकडे निरोप पाठवला की ‘प्लिज तिला घेऊन ये’ . ही आमची पहिली भेट होती. पण यानंतर आमच्यात बाप लेकीचं नातं तयार झालं होतं. एका पॉईंटला देव कसं करतो ना की आता वर्षभरापूर्वी माझे वडील गेले पण त्याअगोदर चार वर्षांपासून मी अशोक पप्पाना ओळखते.

sayali sanjeev ashok saraf and nivedita joshi
sayali sanjeev ashok saraf and nivedita joshi

त्याने ते अगोदरच ठरवून ठेवलं होतं की इथे एक पोकळी निर्माण होणार आहे तर आपण एक तसा सपोर्ट तयार करून ठेवू. आमच्या दोघांतलं हे नातं खूप अमेझिंग आहे “. असे म्हणत सायली संजीवनेही अशोक सराफ यांना पप्पा म्हणण्याचा किस्सा सांगितला आहे. शुक्रवारी २४ नोव्हेंबर रोजी झिम्मा २ हा चित्रपट प्रदर्शित होत आहे. सायली संजीव झिम्मा या चित्रपटाचा भाग नव्हती. पण झिम्मा २ चा भाग बनली असल्याने तीला तिच्या नवीन भूमिकेबाबत खूपच उत्सुकता आहे. या चित्रपटामुळे शिवानी सुर्वे आणि रिंकू राजगुरू सोबत तिची छान गट्टी जमली आहे. तर सिद्धार्थ चांदेकर हा खूप बदमाश आहे त्यालाच सगळ्यांनी सांभाळलं असेही ती म्हणते. झिम्मा चित्रपट पाहिल्यानंतर मी पोट दुखेस्तोवर हसत होते तुम्हीही नक्कीच हसणार असा विश्वास तिने प्रेक्षकांना दिला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button