बारामतीमधील मोरवे या छोट्याश्या गावातला मुलगा मराठी बिगबॉसच्या घरात येतो काय आणि सर्वांची मने जिंकून घेतो काय हे जणू स्वप्नच वाटतं. पण हे शक्य कसकाय झालं? तो बिगबॉसच्या घरात कसा आला ? हा सर्वाना पडलेला प्रश्न. ह्याच प्रश्नाचं उत्तर दिग्दर्शक तसेच कलर्स मराठीचे हेड केदार शिंदे यांनी दिल आहे. सूरज बद्दल बोलताना त्यांनी अनेक गोष्टींचा उलगडा देखील केला आहे.
केदार शिंदे म्हणतात “कास्टिंग करणाऱ्या लोकांनी त्याचं नाव आमच्यासमोर आणलं. थोडसं वेगळं नाव आहे ते त्यामुळे त्याला आधी घ्यावं की नाही घ्यावं? हा सगळ्या त्या मंडळींचा प्रश्न होता. पण मी , सुष्मा आणि राजेश या निर्णयावर ठाम होतो. कारण त्याच्यामध्ये खूप साधेपणा आणि आपलेपणा आहे. मला वाटतं की मी कुठे तरी काम करतोय आणि आज जर या पदावर पोहोचतोय , तर मग तो हक्क प्रत्येकाचा आहे. तो हक्क प्रत्येक माणसाला मिळायला पाहिजे. मी त्याला पहिल्यांदा भेटलो तेव्हा मला असं वाटलं की ‘सच्चा आहे तो ‘. लोकं त्याला प्रेम करतायेत, आनंद आहे. यामुळे सूरज माझ्या आयुष्यभर जवळ राहील..” कलर्स मराठीचे हेड केदार शिंदे यांनी सुरजला बिग बॉसमध्ये संधी दिल्याचे हे कारण सांगितले आहे.
बारामतीमधील मोरवे हे सुरजचं गाव. आई वडील दोघेही हयातीत नाहीत त्यामुळे तो लग्न झालेल्या बहिणींकडे तर कधी आत्याकडे राहून दिवस काढतो. टिकटॉकमधून मिळालेले पैसे त्याच्या मित्रांनी लुबाडले आणि त्यातून त्याला फक्त एक खोली बांधून दिली असे त्याची बहीण म्हणते. सूरज खूप साधाभोळा आहे. पण चांगलं काय आणि वाईट काय ह्याची त्याला फार समाज आहे एवढं मात्र नक्की.