“विराट कोहलीचे चाहते विराट पेक्षाही मोठे जोकर आहेत!” मराठमोळा गायक पत्नी आणि बहिणी देखील विराटच्या चाहत्यांकडून ट्रोल

सोशल मीडिया हे एक प्रसिद्धी मिळवण्याचे माध्यम आहे. पण यामुळे कित्येकदा अडचणी निर्माण होण्याची शक्यता असते. आता मराठमोळा गायक राहुल वैद्य देखील या सोशल मीडियावर चर्चेत आला आहे. मुख्य म्हणजे विराट कोहलीमुळे तो प्रचंड ट्रोलिंगला सामना करत आहे. पण यामुळे राहुलने विराटच्या चाहत्यांना त्याच्यापेक्षा मोठा जोकर असं म्हटलं आहे, हे संपूर्ण प्रकरण नेमकं काय आहे हे जाणून घेऊयात.

‘विराट कोहलीने मला अनफॉलो केलं , त्याने हे का केलं मला काहीच कल्पना नाही’ अशी एक पोस्ट राहुल वैद्य याने सुरुवातीला शेअर केली होती. त्यानंतर काही दिवसांपूर्वी अभिनेत्री अवनीत कौरच्या फोटोला विराट कोहलीने लाईक केले होते. अवनीतमुळे विराट कोहली चर्चेत आला पण सोशल मीडियावर ट्रोल होताच हे चुकून घडलं असं स्पष्टीकरण विराट कोहलीने एका पोस्टद्वारे दिले होते. अवनीत कौर आणि विराट कोहली या चर्चेत राहुल वैद्यने उडी घेतली. अवनीतचा फोटो लाईक केल्याने राहुल वैद्य याने विराट कोहलीवर पुन्हा एकदा निशाणा साधला.

पण आता यामुळे विराटचे फॅन्स राहुल वैद्यला ट्रोल करू लागले आहेत. यावर राहुल वैद्य म्हणतो की, ‘विराटचे चाहते मला, माझ्या बायकोला आणि बहिणीलाही ट्रोल करत आहेत, हे घडतच राहणार’. असे उत्तर दिल्यानंतरही ट्रोलिंग थांबत नसल्याचे पाहून राहुल वैद्यने एक सणसणीत चपराक देणारी पोस्ट शेअर केली आहे. ‘विराट कोहलीचे चाहते विराटपेक्षाही मोठे जोकर आहेत!’ असे राहुलने म्हटले आहे. आता यामुळे हा वाद आणखीनच चिघळला आहे.