news

तुला शिकवीन चांगलाच धडा मालिकेत रंजक ट्विस्ट….अधिपतीच्या खऱ्या आईची होणार एंट्री

झी मराठीवरील तुला शिकवीन चांगलाच धडा या मालिकेत मोठा ट्विस्ट आलेला आहे. काही दिवसांपूर्वी अधिपती आणि अक्षरा हनिमूनसाठी परदेशात गेले होते. पण इकडे मात्र चारुहास यांनी भुवनेश्वरीला घराबाहेरच काढलेले पाहायला मिळाले. इतके दिवस भुवनेश्वरीच्या कटकारस्थानाला कंटाळून चारुहास तिला घरातून हाकलून लावतात. पण मात्र यामुळे अधिपती चारुहास यांच्यावर प्रचंड चिडलेला पाहायला मिळाला. भुवनेश्वरी कुठे गेली आहे याचा शोध आता अधिपती करत आहे त्याला अक्षराची साथ मिळत आहे.

tula shikvin changla dhada adhipati and akshara
tula shikvin changla dhada adhipati and akshara

पण या शोधात अक्षराला भुवनेश्वरी नाही तर अधिपतीची खरी आई चारुलता भेटते. त्यामुळे मालिकेतला हा ट्विस्ट अधिकच रंगतदार होणार आहे. तुला शिकवीन चांगलाच धडा या मालिकेत भुवनेश्वरी नेहमी डाव आखताना दिसते. अधिपतीला तर तिने पूर्णपणे तिच्या बाजूने वळवले आहे. अक्षरा आणि अधिपती एकत्र येऊ नयेत म्हणून ही भुवनेश्वरी नवनवीन डाव आखत असते. तिची ही कारस्थानं पाहून चारुहास तिला बाहेरचा रस्ता दाखवतात. अक्षरा भुवनेश्वरीचा शोध घेत असताना तिला भुवनेश्वरी सारखी दिसणारी एक बाई दिसते. त्याना घरी चला म्हणताच त्या त्यांचे नाव चारुलता सांगतात.

kavita lad tula shikvin changla dhada serial
kavita lad tula shikvin changla dhada serial

त्यामुळे अधिपतीची जन्मदात्री आई आता सूर्यवंशी कुटुंबात पुन्हा दाखल होताना दिसणार आहे. त्यामुळे इतके दिवस गायब असलेल्या चारुलता मागचे सत्य आता उलगडताना दिसणार आहे. पण प्रेक्षकांना यामागे भुवनेश्वरीचा तर डाव नसेल ना अशी शंका वाटत आहे. सूर्यवंशी कुटुंबात पुन्हा प्रवेश करता यावा म्हणून ती चारुलता बनण्याचे नाटक करत आहे का अशी प्रतिक्रिया दिली जात आहे. त्यामुळे या चारुलताच आहेत की भुवनेश्वरी याबद्दल लवकरच उलगडा होईल. या ट्विस्टमुळे मालिका एका वेगळ्या वळणावर येऊन ठेपली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button