गेल्या काही दिवसांत कलाक्षेत्रातील मंडळी व्यवसायाकडे वळली आहेत. यातून अर्थार्जनाचा आणखी एक नवा मार्ग त्यांना गवसला आहे. त्यामुळे भविष्याची चिंता त्यांना राहिलेली नाही. मराठी विश्वातील अनेक सेलिब्रिटींनी साड्यांचा ब्रँड, हॉटेल व्यवसायात इन्व्हेस्टमेंट केली तर काहींनी होम स्टे सारखे बिजनेस सुरू केले. प्रदीप कबरे, मेघा धाडे, प्राजक्ता माळी यांनी त्यांचे सेकंड होम भाडेतत्वावर देण्याचे ठरवले. त्यात आता अभिनेता सिद्धार्थ जाधव च्या पत्नीनेही ३ बीएचके व्हीला भाडेतत्वावर देण्याचा निर्णय घेतला आहे. तृप्ती अक्कलवार ही सिद्धार्थ जाधवची पत्नी आहे. मुंबई पासून २.३० तासाच्या अंतरावर असलेल्या अलिबाग येथील नागाव बिच येथे “तृप्ती कॉटेजेस by स्वैरा एंटरप्राइजेस” या नावाने तिने हा व्हीला भाड्यावर देण्याचे ठरवले आहे.
हा व्हीला इंडिपेंडंट असून ३ बेडरूम, हॉल , किचन अशा सुविधा देण्यात आल्या आहेत. शिवाय एक छोटासा स्विमिंग पूल देखील इथे उपलब्ध करून देण्यात आला आहे. स्वप्नपुर्ती झाली म्हणत या व्हीलाची खास झलक तिने सोशल मीडियावर शेअर केली आहे. तृप्ती अक्कलवार ही स्वतः या व्हीलाची ओनर असून याचे कामकाज तिची मॅनेजमेंट टीम श्वेता शिंदे निभावत आहे. पर्यटकांना कोकण फिरायचं असेल आणि होम स्टे करायचा असेल त्यांच्यासाठी हा व्हीला तिने उपलब्ध करून दिला आहे. हे स्वप्न पूर्ण झाल्यामुळे तृप्ती चा आनंद गगनात मावेनासा झाला आहे.
मध्यंतरी सिद्धार्थ जाधव आणि तृप्ती अक्कलवार घटस्फोट घेत असल्याच्या बातम्या पसरल्या होत्या. पण या बातम्यात काहीच तथ्य नसल्याचे सिध्दार्थने म्हटले होते. त्याच दरम्यान तृप्तीने तिच्या नावातही बदल केलेला पाहायला मिळाला होता. पण तरीही हे दोघे कधी एकत्र पाहायला मिळाले नाहीत. असो, काही वर्षांपूर्वी तृप्तीने स्वतःचा साड्यांचा व्यवसायही उभारला होता. त्यामुळे ती एक यशस्वी व्यावसायिका म्हणूनही ओळखली जात आहे. नुकतेच या स्वप्नपूर्ती निमित्ताने सिध्दार्थने तृप्तीचे कौतुक केले आहे. “अभिनंदन तृप्ती तू पाहिलेलं तुझं स्वप्न पूर्ण झालं…मी खूप आनंदी आहे, देवाची तुझ्यावर अशीच कृपा राहूदे!” म्हणत सुध्दार्थने तृप्तीला “पिवळा बंगला” म्हणत या शुभेच्छा दिल्या आहेत.