सुट्टी सुरू म्हणत अभिनेत्रीचा मालिकेतून मोठा ब्रेक..ठरलं तर मग मालिकेत नवीन अभिनेत्रीची होणार एन्ट्री?

ठरलं तर मग ही मालिका गेल्या काही दिवसांपासून रंजक वळणावर येऊन ठेपली आहे. अर्जुन आणि सायलीच लग्न व्हावं ही प्रेक्षकांची इच्छा आता पूर्ण झाली आहे. अर्जुन आणि तन्वी यांच्या लग्नाचा घाट सुरू असतानाच प्रतिमा आत्याने दिलेलं वचन माग घेतलं आणि अर्जुनला सायलीसोबत लग्न करण्याला वाट मोकळी झाली. आता सायली आणि अर्जुनचा नवीन संसार पुन्हा एकदा मालिकेतून खुललेला पहायला मिळणार आहे. पण आता त्याच बाजूला एका अभिनेत्रीची या मालिकेतून तात्पुरता निरोप घेण्याची वेळ आली आहे.
काही दिवसांपूर्वी अभिनेत्री मोनिका दबडे हिचे मालिकेच्या कलाकारांनी डोहळजेवण साजरे केले होते. मोनिकाने या मालिकेत अस्मिताची भूमिका साकारलेली आहे. पण प्रेग्नन्सीच्या कारणास्तव तिला विश्रांतीची गरज आहे. त्यामुळे”सुट्टी सुरू…” म्हणत मालिकेतून काढता पाय घेतल्याची बातमी तिने चाहत्यांना कळवली आहे. पण आता यामुळे अस्मिताच्या भूमिकेसाठी रिप्लेसमेंट होईल की तिची भूमिका वगळण्यात येईल हे अजून स्पष्ट झालेले नाही. तिने साकारलेल्या भूमिकेच्या जागी आता कुठल्या नव्या अभिनेत्रीला संधी मिळणार का? असाही प्रश्न विचारला जात आहे.

खरं तर मालिकेत अस्मिताचे पात्र काहीसे रंजक आहे. ती सायलीच्या विरोधात जरी वागत असली तरी त्यातून हलका फुलका विनोद निर्माण होत असे. न जाणतेपणाने ती तन्वीला मदत करत होती त्यामुळे तिचे पात्र उठावदार झाले होते. आता अस्मिताच्या जागी दुसरी कोणती अभिनेत्री मालिकेत रुजू झाली तर प्रेक्षकांना ते थोडेसे जड जाणार आहे. येत्या काही दिवसातच मालिकेतला हा बदल प्रेक्षकांना अनुभवायला मिळेल.